Sushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला…

Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर (Maharashtra Politics case ) देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झाल्याचे विधान केलं होतं. (Maharashtra Politics) तसेच यावेळी या (Maharashtra Politics News ) दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह हे माझ्या वडिलांच्याप्रमाणे असल्याचा विधान केले होते. यावर आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी सडकून टीका केली आहे. ( Politics News

दया कुछ तो गडबड है.. माणसाने किती…

सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ भाऊ यांचं वय 59 वर्ष आणि अमित शाह यांचं वय 58 वर्ष. मी विचार केला की 58 वर्षाच्या माणसाला 59 वर्षाचं मुलगा कसा ? दया कुछ तो गडबड है.. माणसाने किती स्वाभिमान गहाण ठेवायचं, असं घणाघात अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय अमित शाह यांच्यावर लगावला आहे. महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेत्या सुषमा अंधारे,माजी मंत्री सुनील केदार,काँगेस कार्याध्यक्ष नसीम खान यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा :  लाल वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच थांबणार? मुख्यमंत्री शिंदे तोडगा काढणार

आमच्याकडून कोऱ्या पेपर वर लिहून घ्या की…

निवडणूक आयोगाने निकाल देण्याच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,केंद्रीय राज्य मंत्री नारायण राणे या तिन्ही लोकांनी निकालाच्या आधी तीन दिवस सातत्याने जे विधाने केली आहेत त्यात ते म्हणतात की आमच्याकडून कोऱ्या पेपर वर लिहून घ्या की, शिवसेना नाव आणि चिन्ह हे आम्हालाच मिळणार आहे. आयोगाचा निकाल लागण्याच्या आधी अशा पद्धतीने हे तिन्ही नेतेमंडळी असे विधान करतात याचा अर्थ काय बागेश्वर बाबा यांची सिद्धी यांना मिळाली होती का, असा टोला यावेळी अंधारे यांनी लागला.

… तेव्हा तोंडाला कुलूप लावून बसता?

शिवजयंतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रा येथे जाऊन शिवजयंती साजरा केली यावर अंधारे यांनी टोला लगावत म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदा आगरा येथे जाऊन शिवजयंती साजरी करण्यात आली असं गवगवा करण्यात आलं कशा मलमपट्टी करण्याची गरज आज यांच्यावर आली आहे. आग्र्याला जाऊन शिवजयंती साजरी करतात पण इथं छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरुषांच्याबाबतीत जेव्हा अपमान होत तेव्हा तोंडाला कुलूप लावून बसतात. तेव्हा कुठे असतात.असा टोला देखील यावेळी अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

हेही वाचा :  114 महिन्यांत दुप्पट होईल पैसा; पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास फायदाच

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जे विधान केलं होत त्यात त्यांनी भीक मागण्याची भाषा केली.पण पाटील यांनी विचार कराव की कोल्हापूर येथे कोणी काहीही दिलं नाही म्हणून तुम्ही कोथरूड मध्ये आले आणि मेधाताई यांच्या कडून मागून घेतलं. मेधाताई कुलकर्णी यांनी काय तुम्हाला भाऊबीज दिली की काय.असा सवाल यावेळी अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …