जिवंत नॉस्ट्रॅडॅमसची भयानक भविष्यवाणी; 2023 या वर्षाचा शेवट एकदम डेंजर

2023 prediction : फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसनं त्याच्या  पुस्तकात एकूण 6 हजार 338 भाकितं वर्तवली  आहेत. नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणी नेहमीच धडकी भरवणारी असते. अशातच एका  ‘द लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने  भयानक भविष्यवाणी केली आहे. 2023 या वर्षाचा शेवट एकदम डेंजर असेल भाकित या व्यक्तीने केले आहे. 

स्वयंघोषित भविष्यवेत्ता

एथोस सालोमे असे या व्यक्तीचे नाव आहे.  37 वर्षीय  एथोस सालोमे (Athos Salomé) ब्राझील देशचाा रहिवासी आहे. तो स्वत:ला ‘द लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस’ म्हणतो. एथोस सालोमे हा स्वयंघोषित मानसशास्त्रज्ञ आहे. त्याने  काही भविष्यवाण्या केल्या आहेत ज्या भयावह आहेत. या वर्षाचा शेवट खूप वाईट असू शकते, असा इशारा त्याने दिला आहे. एथोस सालोमे याने याआधी कोरोना व्हायरस, युक्रेनविरुद्ध युद्ध आणि राणी एलिझाबेथच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. त्याच्या या  सर्व भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या होत्या. त्याचे अनुयायी त्याची तुलना 16 व्या शतकातील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसशी करतात.  

2023 या वर्षाच्या शेवटी मोठा विनाश होणार

2023 या वर्षाच्या शेवटी मोठा विनाश होणार आहे. मानवाला मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागू शकतो. प्रलयकारी पूर आणि विनाशकारी भूकंप येवू शकतो असे भाकित एथोस सालोमे याने केले आहे.या विनाशकाही घटनांचे फक्त भाकितच नाही तर या घटना कुठे घडणार याचे लोकेशन देखील एथोस सालोमे  याने सांगितले आहेत.  पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये सर्वात जास्त प्रभावित होणारे क्षेत्र असतील. इंडोनेशियन बेट जावा आणि उत्तर कॅलिफोर्निया आणि दक्षिण ब्रिटिश कोलंबिया दरम्यानच्या भागात मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊ शकतो असे भाकित एथोस सालोमे याने वर्तवले आहे.  ज्वालामुखी आणि तीव्र भूकंपामुळे या परिसरात मोटा विनाश होईल. फिलीपिन्स आणि थायलंड परिसराला चक्रीवादळचा तडाखा बसू शकतो. अनेक देशांमध्ये महाप्रलयकारी पूर येवू शकतात.ही सर्व भाकिते वर्तवताना एथोस सालोमे याने खबरदारी घेत उपाययोजना करण्याचे अवाहन केले आहे. 

हेही वाचा :  मटार खाल्ल्यामुळे रक्तात जमा होईल Uric Acid, आरोग्याची लागेल वाट, कमी करण्यासाठी असं खा दही



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …