मोफत थाळीचा मोह पडला ९० हजारांना; एका फेसबुक लिंकमुळं महिला अडकली सायबर चोरट्यांच्या जाळ्यात

Cyber Crime: लोकांना गंडा घालण्यासाठी सायबर चोरटे आजकाल नवनवीन फंडे शोधत असतात. सध्या रोज ऑनलाइन फ्रॉडला भुलून लाखो रुपये गमावत आहेत. जसं जसं इंटरनेटचा प्रसार वाढतो आहे तसा सायबर क्राइमच्या प्रकरणातही वाढ होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत असाच एक प्रकार घडला आहे. एका महिलेला प्रसिद्ध रेस्टॉरंटचे अॅप डाऊनलोड करायला सांगून त्यावर चांगल्या फूड ऑफर्स असतात असं सांगून चोरट्यांनी तिच्या अकाउंटमधून तब्बल ९० हाजार रुपये चोरले आहेत. 

महिलेचे नाव सविता शर्मा आहे. २ मेरोजी तिने सायबर सेलमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पण महिलेसोबत ही घटना एक वर्षांपूर्वी म्हणजेच २७ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली आहे. महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की, एक वर्षांपूर्वी तिला मित्राला फोन आला. त्याने एक फेसबुक लिंक पाठवली आणि ते अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. या अॅपवर फुड ऑफर चांगले मिळतात, असं सांगितले. त्यानंतर महिलेने फेसबुकवरील लिंकवर क्लिक केले तर खाली एका व्यक्तीचा नंबर दिला होता. तिने त्यावर कॉल केला. मात्र, सुरुवातीला कोणीच फोन उचलला नाही. थोड्यावेळाने तिला त्याच नंबरवरुन एका व्यक्तीचा फोन आला. 

हेही वाचा :  इंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर

नाशिकः संपूर्ण शरीर फ्रॅक्चर, खेळताना पिठाच्या गिरणीत पडला, तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

महिलेल्या कॉल करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की तो सागर रत्न या हॉटेलमधून बोलतोय. त्यावेळी व्यक्तीने महिलेला अॅप डाऊनलोड करायला सांगितले. तसंच, अॅप डाऊनलोड केल्यास एका थाळीवर एक थाळी मोफत मिळेल. महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवला व त्याने दिलेले अॅप डाऊनलोड केले. अॅप डाऊनलोड होताच कॉल करणाऱ्या व्यक्तीने तिला युजरनेम आणि पासवर्डदेखील दिला. 

महिलेने अॅप सुरू करुन युजर नेम आणि पासवर्ड टाकताच लगेचच एक मेसेज आला. तिच्या बँक खात्यातून ४० हजार रुपये काढण्यात आले होते. त्यानंतर दोन सेंकदाने आणखी एक मेसेज आला त्यात तिच्या खात्यातून ५० हजार रुपये काढण्यात आले. लागोपाठ दोनदा पैसे काढण्यात आल्याने महिला घाबरली. तिने पुन्हा त्या नंबरवर फोन केला मात्र तो काही लागला नाही. 

पिडीत महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की, मी त्यांना बँकेचे डिटेल शेअर न करता ही क्रेडिट कार्डमधून पेटीएमला पैसे ट्रान्सफर झाले. आणि त्यानंतर पेटीएममधून त्या चोरट्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले. मला चूक लक्षात येताच मी लगेचच क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

हेही वाचा :  काकाचा मोबाईल हॅक करुन फोटो, व्हिडीओ पाहिले अन् नंतर... पुतण्याचं धक्कादायक कृत्य



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …