प्रियांका चोप्राच्या सास-यांनी सूनेसाठी लिहिलेली ‘ही’ पोस्ट होतीये प्रचंड व्हायरल, विचार वाचून म्हणाल सासरा असावा तर असा..!

कोणत्याही मुलीचं स्वप्न असतं की तिला एक चांगलं सासर मिळावं. त्यात तिच्या नवऱ्याप्रमाणे तिचे सासू सासरे सुद्धा तेवढेच चांगले आणि मायाळू असावेत. तर या बाबतीत हॉलिवूड मध्ये धुमाकूळ घालणारी बॉलिवूड गर्ल प्रियांका चोप्रा (priyanka chopra) मात्र लकी समजावी लागेल. कारण तिचा पती निक जॉनस (nick Jonas) तर तिच्यावर किती प्रेम करतो आणि जीव ओवाळते हे काय तुम्हाला वेगल्याने सांगायला नको. तिची सासू सुद्धा आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे तिच्यावर माया करते जे सुद्धा स्वतः प्रियांकाने अनेक मुलाखतींमध्ये कबूल केले आहे. पण तिचा सासरा सुद्धा तेवढाच दयाळू आहे हे देखील एका घटनेवरून सिद्ध झालं. जेव्हा तुम्ही सुद्धा जाणून घ्याल तेव्हा म्हणाल सासरा असावा तर असा आणि प्रत्येक सुनेला असाच सासरा मिळावा! (फोटो साभार: इंस्टाग्राम @priyankachopra)

घडलं तरी काय?

प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा यांच्या सोबतचा एक फोटो तिची आई मधू चोप्रा यांनी आपल्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याला एक भावपूर्ण कॅप्शन देत म्हटले की, “एक सुंदर प्रवास”! प्रियांका आणि मधू चोप्रा एकमेकींच्या पोस्टवर कमेंट करत असतातच, त्यामुळे या फोटोवर देखील प्रियांकाने कमेंट केली की, “सुंदर फोटो!” आपल्या वडिलांविषयी प्रियांकाने व्यक्त केलेल्या भावना सगळ्यांच्याच हृदयाला स्पर्श करून गेल्या पण त्याहीपेक्षा तिच्या सासऱ्यांनी या फोटोवर केलेली कमेंट जास्त हृदयस्पर्शी ठरली. (फोटो साभार: इंस्टाग्राम @priyankachopra)

हेही वाचा :  लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये शोषण होतंय, वेळीच पडा बाहेर पाहू नका अंत!

(वाचा :- माझी कहाणी : हनीमूनच्या रात्री ईमेलमध्ये लपवून ठेवलेली एक चिठ्ठी सापडल्याने माझ्या नव-याचं एक खोल रहस्य उघड झालं आणि मग..!)

काय होती ही कमेंट?

पॉल केविन जॉनस हे प्रियांकाचे सासरे आहेत त्यांना पापा जॉनस म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर त्यांनी आपल्या सूनेच्या आईला म्हणजेच मधू चोप्राला खूपच अनोख्या पद्धतीने अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिले की, “काश आमच्या नशिबात सुद्धा प्रियांकाच्या वडिलांना भेटण्याचा योग असता, पण आज तुम्ही दोघी आमच्या आयुष्याचा एक भाग आहात याबाबत आम्ही स्वतःला नशीबवान समजतो.” ज्या पद्धतीने पापा जॉनस यांनी प्रियांका आणि तिच्या आईला आपल्या कुटुंबातील महत्त्वाच्या भागाचा दर्जा दिला तो पाहून साहजिकच कोणाचेही मन भरून येईल. कारण हे सगळं सार्वजनिकपणे बोलण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. (फोटो साभार: इंस्टाग्राम @drmadhuakhourichopra)

(वाचा :- ‘या’ एका भीतीमुळे सलमान खानने आजपर्यंत केलं नाही लग्न, इतक्या मोठ्या अभिनेत्याला नेमकी अशी काय असावी अडचण?)

सास-यांसोबत खास जिव्हाळा

एक सून आणि सासरा म्हणून प्रियांका चोप्रा आणि पापा जॉनस यांचे नाते खूप घट्ट आणि मायेचे आहे. केवळ पापा जॉनस यांचीच प्रियांकाकडे जास्त ओढ आहे असे नाही तर प्रियांका सुद्धा त्यांना आपल्या वडिलांचा दर्जा देते. ही गोष्ट तेव्हा दिसून आली जेव्हा फादर्स डे ला प्रियांकाने आपल्या वडिलांसाठी तर खास पोस्ट केलीच, पण त्या नंतर लगेच आपल्या बाबा समान सासऱ्यांसाठी सुद्धा स्पेशल मेसेज लिहिला. हा मेसेज सुद्धा इतका भावपूर्ण होता की या खास मेसेज साठी प्रियांकाचे सर्वांनी कौतुक केले आणि एक सून म्हणून ती आदर्श असल्याचे म्हटले. (फोटो साभार: इंडियाटाइम्स)

हेही वाचा :  'फडणवीसांची कानदुखी 20-25 कोटींना पडली, राज्यात ‘हत्ती विरुद्ध बेडूक’ अशी...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

(वाचा :- माझी कहाणी : मित्राला हॉटेलच्या एका रूममध्ये एकांतात भेटणं मला पडलं महागात कारण…!)

काय होता तो मेसेज?

फादर्स डे च्या दिवशी प्रियांकाने पापा जॉनस यांच्यासाठी एक खास मेसेज लिहिताना म्हटले की, “हॅप्पी फादर्स डे पापा जॉनस..मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मला तुमच्या सारखे वडील आणि मम्मा जॉनस सारखी आई मिळाली. मला तुमची सून म्हणून तुम्ही स्वीकार केलं आणि आज जे प्रेम व माया तुम्ही मला देताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद!” सार्वजनिकरित्या या प्रकारची पोस्ट एक सून तेव्हाच करेल जेव्हा खरंच तिचं आपल्या सासरच्यांसोबत घट्ट नातं असेल.

(वाचा :- बापरे, दोन्ही मुलांचा मृत्यु झाला नंतर नव-याची साथही सुटली, जगजीत सिंगच्या पत्नीची संपूर्ण कहाणी ऐकली तर तुम्हालाही रडू आवरणार नाही..!)

सासूचीही आहे प्रचंड आवडती

केवळ सासरेच नाही तर सासू डेनिस जोनस देखील तिच्या सुनेवर खूप प्रेम करते. अनेकवेळा तो प्रियंकासोबत हँगआऊट करताना दिसून आली. इतकंच नाही तर लग्नाच्या निमित्तानेही तिने प्रियंकाला असे गिफ्ट दिले होते ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. डेनिसने प्रियांकाला डायमंडने जडलेले कानातले दिले होते, ज्याची किंमत तब्बल 55 लाख रुपये होती. यावरून असे दिसून येते की तिचे तिच्या सुनेवर इतके प्रेम आहे की तिच्यासाठी भेटवस्तू निवडताना ती पैशाचीही पर्वा करत नाही. आता अशी सासू कोणाला नको असेल? (फोटो क्रेडिट्स: इंडियाटाइम्स)

हेही वाचा :  लग्नाआधी बायकोविषयी काही माहीत नव्हतं, नंतर समोर आलं खरं भयाण रूप, आता मी अडकलोय

(वाचा :- सारं काही सोन्यासारखं असूनही लतादिदींनी का नाही केलं आयुष्यभर लग्न? असे निर्णय जे बदलून टाकतात संपूर्ण आयुष्य!)

प्रियांका आहे सगळ्यांची लाडकी

प्रियांकाने सुरुवातीपासूनच आपले सासू-सासरे, आपले दीर, त्यांच्या बायका, मुले यांच्यासोबत एक घट्ट नातं विणायला सुरुवात केली. तिने त्याकरता खास त्यांना वेळ दिला. त्यांच्या सोबत जाऊन ती राहिली. यामधून झाले असे की सर्वचजण एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखू लागले आणि आज त्या सगळ्यांचंच नातं इतकं घट्ट आहे की एक हॅपी फॅमिली म्हणून ते जगतायत. हीच तर प्रत्येक मुलीची अपेक्षा असते की आपल्या सासरच्या घरात आपली खास जागा असावी आणि प्रियांकाची ही अपेक्षा पूर्ण झाली आहे. (फोटो साभार: इंडियाटाइम्स)

(वाचा :- उगाच नाही लाखो मुलींमधून श्लोकाच बनली अंबानी कुटुंबाची सूनबाई, इतक्या परीक्षा पास केल्यानंतरच केली गेली निवड..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर …