मिस वर्ल्ड बनताच sargam kaushal बाबत Google वर वा-याच्या वेगाने शोधली गेली ही माहिती

जम्मू-काश्मीरच्या (Miss World From Jammu Kashmir) सरगम कौशलने मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. सरगमने हा ताज पटकावण्याआधी चित्रपट अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने २००१ साली मिसेस वर्ल्डचा किताब जिंकला होता. हा ताज जिंकणारी अदिती पहिली भारतीय महिला ठरली. दुसरीकडे, सरगमने जिंकताच हा मुकुट 21 वर्षांनंतर भारतात परतला आहे. या स्पर्धेत जगभरातील ६३ देशांतील महिलांनी भाग घेतला होता, त्यापैकी सरगमने यात बाजी मारली आणि एक इतिहासच रचला.

सरगम विजेती झाल्याबरोबर मिसेस कौशल यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव तर होतोच आहे, पण तिच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकताही लोकांमध्ये वाढली आहे. मिसेस वर्ल्ड होण्यापूर्वी सरगम काय करत होती हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तिचा नवरा कोण आहे, ज्याला तिने आपल्या यशाचे श्रेय देखील दिले आहे. (सर्व फोटो- @sargam3 Instagram)

सरगमची हाइट, वय आणि वजन

सरगम कौशलबद्दल तशी तर भरपूर माहिती सर्च केली गेली. पण तरीही गुगलवर तिच्याबद्दल सर्वाधिक सर्च केले गेले ते तिची उंची आणि वय. गुगल सर्चनुसार मिसेस वर्ल्डची उंची किती आहे? ती किती वर्षाची आहे? मिसेस वर्ल्ड 2022 सरगम कौशल 32 वर्षांची आहे. ती जम्मू-काश्मीरची रहिवासी आहे. तिची उंची 5.6 आहे. त्याचवेळी, तिचे वजन 55 ते 60 किलो दरम्यान आहे.

हेही वाचा :  Maharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

(वाचा :- लग्नाच्या 9 वर्षांनंतरही चेतेश्वर पुजाराच्या बायकोपुढे बॉलीवूडच्या सुंदरीही चाय कम पाणी, फोटो बघून व्हाल घायाळ)

सरगम मिसेस वर्ल्ड बनण्याआधी काय करायची?

या वर्षीच्या विजेत्या सरगम कौशलबाबत दुसरा सर्वाधिक शोधला जाणारा प्रश्न होता, सरगम मिसेस वर्ल्ड बनण्यापूर्वी काय करत होती? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या सौंदर्य स्पर्धेची तयारी करण्यापूर्वी सरगम विशाखापट्टणममधील एका शाळेत शिक्षिका होती. तिने इंग्रजी लिट्रेचरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. सरगमचे वडील जीएस कौशल यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, सरगमला शिक्षण क्षेत्रात विशेष रस होता. शिक्षकांना त्यांचा जुना सन्मान परत मिळावा, अशी तिची नेहमीच इच्छा होती.

(वाचा :- पिवळा धम्मक लेहंगा घालून उर्वशी रौतेलाने लावली भावाला हळद, नवरीसारख्या रूपापुढे फिक्या पडल्या मलायका व माधुरी)

सरगमचा नवरा कोण आहे?

सरगमबद्दल तिसरी सर्वात जास्त सर्च केलेली गोष्ट म्हणजे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती. मिसेस वर्ल्डचे नाव समोर येताच लोकांनी विचारले की सरगमचा नवरा कोण आहे? याबाबत झपाट्याने सर्च सुरू केलं. लोक फक्त तिच्या नव-याचाच फोटो शोधत नव्हते तर तिचे लग्न कधी झाले हे देखील जाणून घेण्याची त्यांना इच्छा होती. सरगमचे पती नेवी ऑफिसर आहेत. त्यांचे वय 31 वर्षे आहे. आदित्य मनोहर शर्मा असे त्यांचे नाव आहे. या जोडप्याने 2018 मध्ये लग्न केले. लग्नानंतर तिने सौंदर्य स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला होता. यानंतर ती मुंबईत आली आणि मॉडेलिंगला सुरुवात केली आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला.

हेही वाचा :  Sanjay Raut On Pune Lok Sabha: पुण्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? राऊतांचा अजित पवारांना टोला! म्हणाले, "जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट..."

(वाचा :- मलायका मिनी शर्ट ड्रेस व डोळ्यांवर गॉगल घालून ऐटीत बसली रिक्षात, अ‍ॅटिट्युड व स्माईलने रिक्षाचालकाला लावलं वेड)

या डिझाइनरचा गाऊन घातला होता

मिसेस वर्ल्डच्या अंतिम फेरीसाठी सरगमने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता, जो तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर भावना राव यांच्या कलेक्शनमधून निवडला होता. या आउटफिटमध्ये प्लंगिंग व्ही-नेकलाइन देण्यात आली होती, ज्यासोबत स्लीव्हज कटआउट लूकमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचवेळी, या ड्रेसचा पॅटर्न फिगर-हगिंग ठेवला होता, ज्यामुळे तिची टोन्ड फिगर मस्त हायलाइट केली जात होती. या गाऊनच्या पुढच्या भागाला स्लिट देण्यात आला होता, जो नी-हाय अर्थात गुडघ्यापर्यंत होता. ही डिटेलिंग अशी होती की जी ओव्हरऑल लुकमध्ये टिजिंग इफेक्ट निर्माण करताना दिसत होती. दुसरीकडे, जर आपण अपर पोर्शनबद्दल बोललो, तर त्याला मागील बाजूने बॅकलेस लुक देण्यात आला होता.

(वाचा :- विकी कौशलने केली कियारासोबत धमाकेदार एंट्री पण चकाकत्या बॅकलेस ड्रेसमधील कतरिनाच्या ग्लॅमरस एंट्रीवर लोक घायाळ)

भारताच्या शिरपेचाच मानाचा तुरा..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …