भारत आणि ऑस्ट्रेलियाचे लाइव्ह सामने नेमके कुठे पाहता येतील, जाणून घ्या योग्य चॅनेल

मोहाली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला २० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याममध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. पण या मालिकेतील सामने लाइव्ह कोणत्या चॅनेलवर पाहता येतील, याची माहिती आता समोर आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियातील सामने कधी आणि कुठे होणार, जाणून घ्या…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना हा मंगळवारी २० सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना हा शुक्रवारी २३ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा व मालिकेतील अखेरचा सामना हा रविवारी २५ सप्टेंबरला होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियातील सामने किती वाजता सुरु होणार, पाहा…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेतील टॉस हा संध्याकाळी ७.०० वाजता होणार आहे. यावेळी दोन्ही कर्णधार येतील आणि टॉस झाल्यावर दोघेही आपला संघ जाहीर करतील. त्यानंतर अर्ध्या तासाने हा सामना सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हे तिन्ही सामने संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून सुरु होणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने लाइव्ह कुठे पाहता येतील, जाणून घ्या…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका ही स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर लाइव्ह पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स समूहातील काही चॅनेल्सवर हे सामने पाहता येतील. त्याचबरोबर या सामन्यांचे लाइव्ह अपडेट्स तुम्हाला महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर पाहता येऊ शकतात.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ही विश्वचषकासाठी महत्वाची ठरू शकते. कारण विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर भारताचा चांगला सराव होऊ शकतो. त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला अजून काही प्रयोग करायचे असतील तर त्यांना या मालिकेत करता येऊ शकतात. या मालिकेत हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे खेळाडू खेळणार नाहीत, त्यांना बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यामुळे ते थेट विश्वचषक खेळतील, असे म्हटले जात आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous “आदित्य ठाकरेंनी लग्न करायचं की नाही हे…”; रामदास कदम यांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर
Next IND VS AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सामन्यात पाऊस ठरणार का व्हिलन, जाणून घ्या…

Check Also

भारतीय संघाला धक्का बसल्यावरही सूर्यकुमार यादवसाठी आली गूड न्यूज, पाहा नेमकं घडलं काय…

मोहाली : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. पण दुसरीकडे मात्र या सामन्यात धडाकेबाज …

रोहित शर्माने लाइव्ह सामन्यात केला स्टीव्हन स्मिथला इशारा, व्हिडिओ पाहाल तर हसतच राहाल…

मोहाली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चांगलाच रंगला. दोन्ही संघांवर यावेळी भरपूर दडपण होते. …