‘कॉफी विथ करण’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये बॉलिवूडचे ‘प्रीती-कबीर’ अर्थातच अभिनेत्री कियारा आडवाणी आणि शाहिद कपूर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी करण आणि शाहिदने कियारा आडवाणीसोबत बरीच मजामस्ती केली. या दोघांनी सिद्धार्थच्यासोबतच्या नात्याबाबत बोलण्यासाठी कियाराला बरेच आढेवेढे प्रश्न विचारले होते. हा एक मजेदार एपिसोड होता. यामध्ये कियारा आडवाणीनेसुद्धा काही प्रमाणात आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि विकी कौशल या शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळीही विकी आणि करणने सिद्धार्थला त्यांच्या नात्याबाबत बोलण्यास भाग पाडलं होतं. आणि सिद्धार्थने काहीशे आडफाटे घेत आपलं नातं कबुल केलं होतं.
दरम्यान कियारा आडवाणीने आपल्या लग्नाबाबतही संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीनं म्हटलं, ‘मी लग्नव्यवस्थेवर नेहमीच विश्वास ठेवला आहे. मी माझ्या घरात अनेक सुंदर लग्न पाहिली आहेत. त्यामुळे मीसुद्धा आयुष्यात लग्न करु इच्छिते. परंतु माझ्या लग्नाचे प्लॅन्स मी या शॉवर अजिबात उघड करणार नाहीय. परंतु लग्नामध्ये तुम्हा सर्वांना नक्कीच आमंत्रण असणार. या एपिसोडमध्ये रॅपिड फायरवेळीसुद्धा कियाराने अनेक रंजक खुलासे केले आहेत. यावेळी करणने कियाराला विचारलं होतं, ‘तुला तुझ्या लग्नात वधूपक्षात कोणती अभिनेत्री पाहायला आवडेल?’ यावर पटकन उत्तर देत कियाराने म्हटलं मला आलिया भट्टला पाहायला आवडेल. ती फारच गोंडस आणि चांगली आहे. माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे’.
(हे वाचा:Pushpa 2 मध्ये रश्मिका मंदानाची दमदार भूमिका; समोर आली चित्रपटाबाबत मोठी अपडेट )
कियाराच्या या उत्तरानंतर चाहते मात्र चकित झाले आहेत. कारण आलिया भट्ट ही सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आहे. सिद्धार्थ आणि आलियाने बराच काळ एकमेकांना डेट केलं आहे. या दोघांनी करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द ईयर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटानंतरच ते एकमेकांच्या जवळ आले होते. आणि त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आल्याचं म्हटलं जातं. मात्र काही वर्षांपूर्वी या दोघांचा ब्रेकअप झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या