जॉन अब्राहमच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर लाँच, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘तेहरान’

John Abraham Movie : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तेहरान’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘तेहरान’ (Tehran) हा एक अ‍ॅकशन थ्रिलर चित्रपट आहे. जॉन अब्राहम नेहमीच आपल्या अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो त्याचं अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जॉन अब्राहमने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात जॉन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. जॉनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अरूण गोपालन करणार आहेत. ‘तेहरान’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, त्याची कथा-मांडणी आशीष पी वर्मा यांनी केले आहे.   

यावेळी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरसोबतच रिलीज डेटबद्दलचीसुद्धा माहिती देण्यात आली आहे. ‘तेहरान’ हा चित्रपट पुढच्या वर्षात पहिल्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अर्थात हा चित्रपट प्रजासत्ताक दिनानिमित्ताने म्हणजेच 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

 


जॉन अब्राहम आणि अ‍ॅक्शनचं समीकरण!

जॉन अब्राहम हा अशा बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांनी यापूर्वी देखील अ‍ॅक्शन चित्रपटांद्वारे लोकांचे मनोरंजन केले आहे आणि त्यात तो यशस्वीही झाला आहे. त्याच्या या आधी प्रदर्शित झालेल्या अ‍ॅक्शन चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ‘मुंबई सागा’, ‘बाटला हाऊस’, ‘सत्यमेव जयते’, ‘ढिशूम’, ‘फोर्स’, ‘फोर्स 2’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचा यात समावेश आहे. प्रेकक्षकांना हे चित्रपट तर आवडलेच, पण त्यात जॉनच्या कामाचे खूप कौतुक झाले.

जॉनकडे चित्रपटांची रांग

‘तेहरान’ व्यतिरिक्त जॉनकडे अनेक चित्रपट आहेत. यावर्षी जॉनचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात. यात ‘अटॅक’, ‘एक व्हिलन 2’ आणि ‘पठाण’ यांचा समावेश आहे. ‘पठाण’मध्ये जॉन व्हिलनचे पात्र साकारत आहे, तर शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जॉनने ‘पठाण’साठी मोठी रक्कम आकारली आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Jubin Nautiyal Health Update : जुबिन नौटियालला रुग्णालयातून डिस्चार्ज

Jubin Nautiyal Health Update : लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) सध्या चर्चेत आहे. जिन्यांवरुन …

Happy Birthday Konkona Sen Sharma : राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी कोंकणा सेन शर्मा!

Konkona Sen Sharma : बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) आज 42 वा …