खासगी शाळेत शिकल्याने तुमचा पाल्य हुशार होईल का? धक्कादायक संशोधन समोर

Private school Education: आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळून तो हुशार व्हावा यासाठी बहुतांश पालक खासगी शाळांची निवड करतात. सरकारी शाळांपेक्षा खासगी शाळांमध्ये टाकल्यास विद्यार्थी हुशार होतात असा त्यांचा समज असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावर सकारात्मक परिणाम होईल असे तुम्हालाही वाटत असेल तर तसे नाही आहे. यासंदर्भात एक नवीन संशोधन समोर आले आहे.

सॅली लार्सन आणि अलेक्झांडर फोर्ब्स, जे न्यू इंग्लंड विद्यापीठातून शिक्षण आणि मानसशास्त्रात पीएचडी करत आहेत. त्यांनी एका शोधनिबंधात याबद्दल तपशीलवार लिहिले आहे. हा संशोधन अहवाल द कॉन्व्हर्सेशनवर प्रसिद्ध झाला आहे.

‘खासगी शाळा त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देतात आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना अधिक चांगले सेट करतात असा बहुतेक पालकांचा विश्वास आहे. परंतु हे गृहितक खरे आहे की नाही यावर निर्णायक पुरावा नसल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार
ऑस्ट्रेलियामध्ये नर्सरीपासून चौथीपर्यंतची ३० टक्के मुले आणि पाचवी ते आठवीपर्यंतची ४० टक्के मुले खासगी शाळांमध्ये शिकतात. खासगी शाळांचे शुल्कही त्या चालविणाऱ्या संस्थांनुसार बदलत असतात. त्यामुळे कॅथलिक शाळांमध्ये शिकवणे साधारणपणे कमी खर्चिक असते. या शाळांमधील कुटुंबाला दरवर्षी ४० हजार डॉलरपेक्षा जास्त शुल्क भरावे लागते.

हेही वाचा :  IDBI Bank Recruitment 2023

‘स्वतंत्र शाळा’ असे संबोधले जात असूनही ऑस्ट्रेलियातील सर्व शाळांना सरकारी निधी मिळतो. सरासरी कॅथोलिक शाळांना त्यांच्या निधीपैकी सुमारे ७५ टक्के निधी मिळतो. स्वतंत्र शाळांना त्यांच्या निधीपैकी सुमारे ४५ टक्के निधी राज्य आणि फेडरल सरकारांकडून मिळतो.

Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती
शैक्षणिक गुणांबद्दल संशोधन काय म्हणते?
सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीच्या दृष्टीने, NAPLAN मधील खाजगी शाळांमध्ये शिकणारी मुले सार्वजनिक शाळांमधील मुलांपेक्षा वेगळी नाहीत. ऑस्ट्रेलियात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या इतर संशोधनाच्या अनुषंगाने हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ज्यातून असे सिद्ध होते की, कौटुंबिक पार्श्वभूमी ही खासगी शाळेत जाण्याची शक्यता आणि शैक्षणिक उपलब्धी या दोन्हीशी संबंधित आहे.

CISF मध्ये बारावी पास असणाऱ्यांना संधी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार
खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीमध्ये फरक दिसून येत असला तरी, मुलाची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी विचारात घेणे देखील महत्वाचे आहे. खासगी शाळांमध्ये शिकणे नेहमीच उत्तम नसते, असे २०१८ मध्ये प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल असेसमेंट (PISA) चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या ६८ शिक्षण प्रणालींच्या विश्लेषणाने सिद्ध झाले आहे.

OECD अहवाल काय म्हणतो?
OECD देशांमध्ये आणि ४० शिक्षण प्रणालींमध्ये, खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी सार्वजनिक शाळांमधील मुलांपेक्षा जास्त वाचन गुण मिळवले. ही गणना त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे मूल्यांकन न करता केली गेली. ही गणना करण्यात आली तेव्हा सार्वजनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे गुण खासगी शाळांच्या मुलांपेक्षा जास्त होते.

हेही वाचा :  ही कसली मनमानी! शाळेचीच बस वापरण्याचा हट्ट, पुण्यात विद्यार्थ्यांना थेट गेटबाहेर काढलं

Government Job: एचपीसीएलमध्ये विविध पदांची भरती
CBI Recruitment 2022: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

Rail India Technical and Economic Service Invites Application From 257 Eligible Candidates For Apprentice Posts. …

जिल्हा न्यायालय महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची भरती

District Court Invites Application From 5793 Eligible Candidates For Stenographer, Junior Clerk & Peon/ Hamal …