ITI Admission: आयटीआय प्रवेशाला २७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ITI Admission: औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (Industrial Training Institute, ITI) प्रवेशाकरीता २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून मुंबई विभागातील इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांनी केले आहे.

मुंबई विभागाच्या वतीने मुलुंड आयटीआय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई विभाग सहसंचालक यांच्यावतीने ही माहिती देण्यात आली. विविध व्यवसायनिहाय प्रवेशासाठी उपलब्ध जागा तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती विभागाच्या www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे. विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करु न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती (एडीट) करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे यासाठी संकेतस्थळावर १ ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत

मुंबई विभागातील ७ जिल्ह्यात ६७ शासकीय आयटीआय असून यामध्ये ४९ सर्वसाधारण आयटीआय, ३ महिलांकरिता आयटीआय, १० आदिवासी आयटीआय, २ अल्पसंख्याक आयटीआय, ३ आदिवासी आश्रमशाळा आहेत. याशिवाय मुंबई विभागात ३९ खासगी आयटीआय आहेत. शासकीय व खासगी आयटीआयमध्ये २० हजार १८४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विविध व्यवसायनिहाय प्रवेशासाठी उपलब्ध जागा तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती विभागाच्या www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

HAL Job 2022: पदवीधरांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये बंपर भरती; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
२९ जुलै २०२२ पर्यंत केंद्रीय ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाकरीता मुंबई विभागातील एकूण ६७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील १२ हजार ३९४ उमेदवारांना प्रवेश वाटप करण्यात आले असून १ ऑगस्टपर्यंत २ हजार १५७ उमेदवारांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेश ३ ऑगस्ट पर्यंत निश्चित करण्याबाबत उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे.

विविध व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया ५ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रवेश निवड यादी व अन्य माहितीकरीता विभागाच्या संकेतस्थळास भेट द्यावी.

आयटीआयमधील सर्व व्यवसायांसाठी एकूण उपलब्ध जागांच्या ३० टक्के जागा महिला उमेदवारांकरीता राखीव आहेत. तसेच विभागातील २ अल्पसंख्याक आयटीआयमध्ये ७० टक्के जागा अल्पसंख्याक समूहाकरीता उपलब्ध आहेत. आदीवासी समूहाकरीता १० संस्थांमध्ये ७५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

ITI Admission:गुणवत्ता यादीत मुलींचे प्रमाण १३ टक्केच
ITI Admission: आयटीआय अर्जसंख्येत घट!

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी रोहित शर्माची चिंता वाढली, भारताला बसू शकतो मोठा फटका…
Next महानायक अमिताभ बच्चन यांनी उडवली मिस्टर परफेक्शनिस्टची खिल्ली, पाहा मजेदार VIDEO

Check Also

Internship Courses: विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कोर्सेस तयार करुन ‘क्रेडिट’ द्या- AICTE

म. टा. प्रतिनिधी, पुणेविज्ञान तंत्रज्ञानातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग या विषयांमध्ये पदवी किंवा …

RTE Admission: आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये असमन्वय, पालकांसह अधिकारीही संभ्रमात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गतच्या (आरटीई) प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण संचालनालय आणि जिप. शिक्षण …