इथल्या गवताला आमच्या बालपणाचा वास येतो, कुशल बद्रिके रमला अमूल्य आठवणींत!

मुंबई : कुशल बद्रिके जितका छोट्या पडद्यावर लोकप्रिय आहे, तितकाच सोशल मीडियावरही आहे. त्याच्या वेगवेगळ्या पोस्ट खूप व्हायरल होत असतात. त्यानं शेअर केलेले फोटो, व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना आवडतात. आताही त्यानं आपल्या बालपणीच्या काही सुंदर आठवणी शेअर केल्या आहेत.

अभिनेत्रीकडे नाहीत उपचारांसाठीचे पैसे, सरकारी इस्पितळात भरती

कुशलनं एका हिरव्यागार मैदानावरचा फोटो शेअर केला आहे. त्यात त्याचे मित्रही दिसतायत. कुशल लिहितो, ‘माझ्या जुन्या घराला लागून एक छोटं मैदान आहे. तसं माझं बालपण घरापेक्षा जास्त वेळ या मैदानातच गेलं खरं तर. अगदी भातुकलीपासून कबड्डी, खोखो, क्रिकेट, आबादुबी, लपंडाव, पतंग ते होळी, दिवाळी, दहीहंडीपर्यंत सगळं सगळं तिथे अनुभवलं. आज माझ्या मुलाला निबंध म्हणून १० मार्कासाठी जे जे विषय आहेत ते ते सगळं “माझं” या मोकळ्या मैदानात शिकून आणि जगून झालंय.’

कुशल पुढे लिहितो, ‘बालपणी इथल्या “गवताचा वास” आमच्या अंगाखांद्याला चिकटून राहायचा. कितीही घासून आंघोळ केली तरी जाता जायचा नाही. हा “वास” आता इतक्या वर्षांनी पाहिलं तर इथल्या गवताला आमच्या बालपणाचा वास येतो.’ कुशल अगदी नाॅस्टॅलजिक झालेला जाणवतो. प्रत्येकालाच आपल्या बालपणातल्या गोष्टी लक्षात असतात, त्या तितक्याच मौल्यवानही असतात. सेलिब्रिटींचंही फारसं काही वेगळं नसतं.

Video : रमा म्हणतेय, बाई ग कमालच झाली; तर आनंदी सांगतेय उघडलेल्या दाराची गोष्ट

अभिनेत्याला निसर्गाची हिरवाई आवडते, असं अनेकदा त्याच्या पोस्टमधून दिसतं. मागे त्यानं एका हिरवळीवरचा फोटो टाकत लिहिलं होतं. त्यानं हिरव्या रंगाचा टीशर्टही घातलेला. कुशल लिहितो, ‘आपल्या आजूबाजूचा हिरवा रंग आपल्यात उतरत जातो, मनाला नवी पालवी फुटते आणि हळूहळू बहरत जातो आपण. फक्त पाऊस बनून कुणीतरी “बरसत” राहणार हवं आयुष्यात.’ त्याचे चाहते नेहमीच त्याच्या पोस्टची वाट पहात असतात.

बयो स्वतः सांगतेय, छोट्या बयोच्या मोठ्या स्वप्नाच्या शुटिंगची गोष्ट

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘अगंबाई अरेच्चा’तील ती चिमुकली; ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत

मुंबई, 21 सप्टेंबर : दिग्दर्शक केदार शिंदे यांची मराठी नाटकं असो किंवा सिनेमा.  त्यांचा प्रत्येक …

कतरिना कैफला करायचं होतं Kiss; गुलशन ग्रोव्हर यांनी त्या सीनसाठी २ तास केलेला सराव

मुंबई: अभिनेत्री कतरिना कैफ सध्या इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सलमान खान, आमिर खान, शाहरुख …