कोरोनाच्या कोणत्या घातक व्हेरिएंटच्या विळख्यात सापडले IPL फाऊंडर ललित मोदी? ४ वेळा लस घेऊनही जीव धोक्यात

भारतातील क्रिकेटला IPLच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेणारे ललित मोदी यावेळी गंभीर समस्येतून जात आहेत. कोरोनाच्या नव्या घातक व्हेरिएंटच्या विळख्यात सध्या ललित मोदी सापडले आहेत. ललित मोदी मेक्सिकोमध्ये सुट्यांकरता गेले होते तेथे त्यांना कोरोनाची लागण झाली.

ललित मोदीने सोशल मीडियावर काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्याने चार वेळा लस घेऊनही त्यांना कोविडचे इंफेक्शन झाले आहे. त्याने लिहिलं आहे की, ‘कोरोनाचा नवा स्ट्रेन अतिशय घातक आहे. आताही त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे.’ त्यामुळे त्यांनी सगळ्यांनाच निरोगी राहण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य – iStock / Lalit Modi Instagram)

ललित मोदीचे ट्विट

​कोणत्या व्हेरिएंटमध्ये अडकले ललित मोदी?

ललित मोदीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. मेक्सिको किंवा अमेरिकेत कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे. Our World in Data नुसार, मेक्सिकोमध्ये ओमिक्रॉनचे बीए.५, बीएक्यू१ आणि एक्सबीबी व्हेरिएंट सर्वात प्रमुख आहेत. ज्यामधील ओमिक्रॉन एक्सबीबी १.५ सर्वात नवीन आणि झपाट्याने पसरणारा व्हेरिएंट आहे.

हेही वाचा :  पोलिसांमधील ही माणुसकी सोशल मीडियावर प्रत्येक जण शेअर करतोय... पाहा व्हिडीओ

(वाचा – Oil for Thyroid Health: थायरॉइड एका झटक्यात बरे करतात हे ५ तेल, लक्षणे दिसताच करा वापर))

​डब्ल्यूएचओने व्यक्त केली चिंता

डब्ल्यूएचओने नुकत्याच एका पत्र परिषदेत सांगितलं की, ओमिक्रॉन एक्सबीबी १.५ कोरोनाच्या गेल्या व्हेरिएंटपेक्षाही धोकादायक आहेत. लस घेतलेल्या लोकांनाही करोनोची लागण पुन्हा होत आहे. अमेरिकेत या व्हेरिएंटची प्रकरणे झपाट्याने वाढत आहे.

(वाचा – Tips for Belly Fat Loss: लटकणारी ढेरी कमी करायचीय? तर चुकूनही ब्रेकफास्टमध्ये खाऊ नका हे ५ पदार्थ)

​ललित मोदींना पुन्हा झाला कोरोना

ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सांगितले की, ते मेक्सिकोहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने लंडनला पोहोचले असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण तरीही त्यांना ऑक्सिजन लावावा लागतो. कारण, यावेळी त्याला कोविडचा दुहेरी झटका आला आहे. याचा अर्थ गेल्या २४ दिवसांत तो सलग दोनदा संसर्गाच्या विळख्यात आला आहे.

(वाचा – Herbs For Uric Acid : शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त झाल्यास दिसतात ही लक्षणे, हर्ब्सच्या माध्यमातून करा बचाव))

​निमोनिया आणि इंफ्लुएंजा देखील

एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये ललित मोदींनी सांगितले की, त्यांना दुहेरी कोविडसह न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा आहे. त्यामुळे वसुली अतिशय संथ होत आहे. न्यूमोनियामध्ये, फुफ्फुसातील हवेच्या पिशव्या सूजतात आणि पू किंवा द्रवाने भरतात. तर, इन्फ्लूएंझा हा फुफ्फुसाचा संसर्ग देखील आहे.

हेही वाचा :  "नवनीत राणा बारावी नापास खासदार"; पाहा कोणी केली बोचरी टीका

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

(वाचा – जेवताना किंवा जेवणानंतर नक्की कधी प्यावं पाणी, मास्टर शेफ रणवीर ब्रारने सांगितलं यामागचं खरं सत्य))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …