आधी कॅन्सर आणि आता ऑटोइम्युन आजाराची लागण, सेल्फी शेअर करत अभिनेत्री​ म्हणाली ‘हा आजार माझा रंग हिरावून घेतोय’ ​

​पोस्टमध्ये काय आहे

काळ्या रंगाचा टी-शर्ट, टाइट्स, जॅकेट आणि हातात कप अशा लूकमध्ये ममता या फोटोमध्ये पहायला मिळतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे, ‘प्रिय सूर्य, मी तुझ्या सुंदर किरणांना अशा पद्धतीने अनुभवतेय, जसं याआधी मी कधीच अनुभवलं नव्हतं. मी माझा रंग गमवत आहे.

माझ्या शरीरावर बरेच डाग आहेत. आज मी पहाटे तुझ्याही आधी जागी होते. धुक्यातून तुझ्या प्रकाशाचा पहिला किरण बाहेर पडताना पाहण्यासाठी.. या गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे.’ या पोस्टसोबत ममताने कलर, ऑटोइम्युन आजार, विटिलिगो असे हॅशटॅग वापरले आहेत.

​अभिनेत्री म्हणते ‘सकारात्मक रहा’

ममताने याआधी कॅन्सरवर यशस्वी मात केली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिने अमेरिकेत त्यावर उपचार घेतले. 2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं होतं. “आजारपणाआधी मी जितकी कणखर होती, तितकीच मी आताही आहे असं मी बोलू शकत नाही. मात्र माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच घाबरतेय. पण आयुष्यात काहीही होऊ दे आयुष्यात सकारात्मक राहा असं ती म्हणाली होती.

हेही वाचा :  Coronavirus : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार, मृत्यूचा आकडा भयावह; तर दररोज 9000 बळी...

​विटिलिगो ऑटोइम्युन आजार म्हणजे नक्की काय ?

विटिलिगो ऑटोइम्युनमध्ये त्वचेच्या काही भागांमध्ये हलका पांढरा येऊ लागतो. या आजारात शरीरात मेलानोसाइट्स काम करणे थांबवतात किंवा मरतात. त्यामुळे त्वचेवर दुधासारखे पांढरे डाग पडू लागतात.(फोटो सौजन्य: Instagram @mamtamohan)

​विटिलिगो ऑटोइम्युन आजार कसा होतो?

‘नॅशनल इटालियन फ्रॅक्चर रिस्क डाटाबेस’ या नियतकालिकात या संदर्भात महिती मिळते. वाहनांमुळे किंवा उद्योगांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाच्या संपर्कात सातत्याने आल्याने शरीरात एखादा विशिष्ट आजार होण्यासाठी अनुकूल प्रतिकारशक्ती तयार होते. अशा स्थितीत कमी प्रतिकारशक्तीमुळेच काही आजार निर्माण तयार होतात यात ऑटोइम्युनचा देखील समावेश आहे. (वाचा :- त्वचेच्या आरोग्यासाठी आणि घनदाट केसांची काळजी घेण्यासाठी 4 गोष्टींनी बनलेले हे डिटॉक्स ड्रिंक नक्की ट्राय करा)

​विटिलिगोवरील उपचार

  1. प्रकाश थेरपी
  2. डिगमेंटेशन
  3. सर्जिकल त्वचा ग्राफ्टिंग
  4. आहारातील बदल
  5. तुम्हाला त्वचारोगाचा त्रास होत असल्यास, आमच्या त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

(टिप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …