इन्व्हर्टरची योग्य काळजी न घेतल्यास त्यात होऊ शकतो स्फोट, धोका टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: आजकाल इन्व्हर्टर अनेक घरांमध्ये दिसते. अचानक लाईट्स गेले की, हे डिव्हाइस मदतीला येते. विशेष म्हणजे, वर्क फ्रॉम होममुळे ज्याप्रमाणे इंटरनेटचा वापर वाढला त्याचप्रमाणे लाईट्स गेल्यावर कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून इन्व्हर्टरचा वापर देखील वाढला. पण, आवश्यक ती देखभाल न केल्यामुळे इन्व्हर्टरमध्ये स्फोट होण्याच्या घटना देखील यापूर्वी घडल्या आहेत. म्हणूनच या महत्वाच्या डिव्हाइसची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. इन्व्हर्टरची देखभाल करायची झाल्यास यात सर्वाधिक महत्वाची आहे ती त्याची बॅटरी. तुमच्या इन्व्हर्टरच्या चांगल्या कामगिरीमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे. इतर कोणत्याही घरगुती उपकरणाप्रमाणे, तुमचे इन्व्हर्टर आणि त्याची बॅटरी योग्यरित्या कार्य करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. हे घरातील स्टील कोटेड डबल डोअर रेफ्रिजरेटर किंवा काळ्या चमकदार मायक्रोवेव्हसारखे डेकोरेटिव्ह नसले तरी, वीज गेल्यावर उपयोगी पडणारे महत्वाचे उपकरण आहे.

वाचा: आता आधार, पॅनसारखे महत्वाचे डॉक्युमेंट्स हरविण्याचे टेन्शन नाही, फॉलो करावी लागेल ‘ही’ सोप्पी पद्धत

इन्व्हर्टरची योग्य ती काळजी घेतल्यास त्यामध्ये स्फोट होण्यासारख्या गंभीर घटना टाळता येतात. तसेच, बॅटरीही दीर्घकाळ चालते. सर्वात महत्वाचे म्हणजे इन्व्हर्टर बसवण्यासाठी नेहमी हवेशीर जागा वापरा. इन्व्हर्टर बॅटरी चार्जिंग आणि ऑपरेशन दरम्यान गरम होते. या प्रकरणात, हवेशीर जागेमुळे बॅटरी गरम होण्यासारख्या समस्या येतात. इन्स्टॉलेशन नंतर बॅटरी नियमितपणे वापरत रहा. तुमच्याकडे लाइट्स जाण्याचे प्रमाण कमी असले तरीही, महिन्यातून एकदा बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज करा आणि नंतर ती रिचार्ज करा. बॅटरीची पाण्याची पातळी दर दोन महिन्यांनी मोजणे आवशयक आहे. पाण्याची पातळी कमाल आणि किमान पाणी पातळी दरम्यान असावी याची खात्री करा. डिस्टिल्ड वॉटरने बॅटरी नेहमी टॉप अप करा.

हेही वाचा :  Exclusive: एतशाचा गुढीपाडवा लुक आहे कमाल, पारंपरिक वेषातील नाजूक नार

नळाचे पाणी किंवा पावसाचे पाणी वापरू नका. कारण, त्यात अतिरिक्त खनिजे आणि अशुद्धी असतात. यामुळे बॅटरी खराब होऊ शकते. बॅटरीच्या कडा नेहमी स्वच्छ ठेवा. त्यावर धूळ बसू देऊ नका. बॅटरी टर्मिनल्सना गंज पासून संरक्षित करा. जर टर्मिनल्स खराब झाले असतील, तर कोमट पाणी + बेकिंग सोडा यांचे द्रावण गंजलेल्या भागात लावा आणि टूथब्रश वापरून ते घासून टाका. गंज निघून गेल्यावर, टर्मिनल, नट आणि बोल्टला पेट्रोलियम जेली किंवा व्हॅसलीन लावा. गंज बॅटरी चार्जिंग देखील कमी करते. बॅटरीच्या आजूबाजूचे व्हेंट धूळमुक्त आणि उघडे आहेत याची काळजी घ्या. कारण, ब्लॉक केलेल्या व्हेंटमध्ये हायड्रोजन वायू जमा होतो, ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

वाचा: या स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स आणि डिझाईन पाहून महागड्या फोन्सचा पडेल विसर

वाचा: अनलिमिटेड कॉलिंगसाठी बेस्ट आहेत हे ९ प्रीपेड प्लान, सर्वात स्वस्त ४९ रुपयाचा, ५६ GB पर्यंत डेटासह अनेक फायदे

वाचा: सिम कार्ड खरेदी करतांना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास व्हाल Sim Card Fraud चे शिकार

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

संजय राऊत यांचीसुद्धा खासदारकी जाणार? हक्कभंग प्रकरणाची सुनावणी आता राज्यसभेत

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबद्दल आक्षेपार्ह …

राहुल गांधींना अर्धा तास घाण्याला जुंपलं तर…; ‘मी सावरकर नाही’ विधानावरुन एकनाथ शिंदे संतापले

Eknath Shinde on Rahul Gandhi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिवेशनाच्या समारोपाचं भाषण करताना …