MBBS Admission 2022: वैद्यकीय पदवी प्रवेशांना मुदतवाढ

MBBS Admission 2022:  वैद्यकीय पदवी प्रवेशांना मुदतवाढ


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीएस्सी नर्सिंग, बीओटीएच, बीएएसएलपी अशा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना राज्य कोट्यांतर्गत पहिल्या फेरीतून प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांना येत्या शनिवारीपर्यंत (१९ फेब्रुवारी) प्रवेश घेता येणार आहे,’ अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त आर. एस. जगताप यांनी बुधवारी दिली आहे.

सीईटी सेलकडून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार प्रवेशाच्या पहिल्या फेरीत गुणवत्तायादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवारपर्यंत (१६ फेब्रुवारी) आपला प्रवेश निश्चित करायचा होता. त्याचप्रमाणे ‘स्टेटस रीटेन्शन फॉर्म’ भरण्याची मुदत होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे प्रवेश निश्चित करता आला नाही. त्यामुळे प्रवेश घेण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन सीईटी सेलने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुदतवाढ करण्यात आल्याची माहिती दिली. या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

सीईटीच्या निर्णयाबाबत घाई नको; शिक्षणतज्ज्ञांची अपेक्षा

Bsc Nursing Syllabus 2022: बीएस्सी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात यंदापासून बदल
MHT CET Exam 2022: महाराष्ट्र सीईटीचा अभ्यासक्रम आणि मार्किंग स्कीम जाहीर

हेही वाचा :  कंडक्टरची मुलगी झाली राज्य करनिरीक्षक, आई देवाघरी गेली पण लेकीनं शब्द खरा करुन दाखवला

Source link