MHT CET 2022: सीईटींचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (CET Cell) उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षांचे (MHT CET 2022) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आगामी सात दिवसांत आठ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मे आणि जून महिन्यात या परीक्षा होतील, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.

सीईटी सेलकडून केवळ इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर आदी पदवी अभ्यासक्रमांसाठी ‘एमएचटी-सीईटी’साठी फेब्रुवारीमध्येच ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू केली. मात्र, उर्वरित १४ सीईटी परीक्षांसाठी अर्ज नोंदणी; तसेच वेळापत्रकाबाबत कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नव्हती. परीक्षांबाबत माहिती प्रसिद्धी करण्याची विद्यार्थी-पालकांनी मागणी केल्यानंतर, सीईटी सेलने आठ सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार लॉ (पाच वर्षे), बीएड, लॉ (तीन वर्षे), बीपीएड, बीए-बीएड/ बीएस्सी-बीएड, बीएड-एमएड, एमपीएड, एमएड अशा आठ अभ्यासक्रमांना प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक, माहिती पुस्तिका, अर्ज नोंदणी, परीक्षेचा दिनांक याबाबतची सविस्तर माहिती १९ ते २४ मार्च या कालावधीत सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. या परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडतील, अशी माहिती सीईटी सेलद्वारे देण्यात आली. मात्र, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) अखत्यारित येणाऱ्या काही अभ्यासक्रमांच्या सीईटींबाबत कोणतीही माहिती सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

हेही वाचा :  हजारो लोकांच्या नोकऱ्या जाणार! २ अमेरिकन कंपन्यांतील कपातीमुळे आशियातील कर्मचाऱ्यांना फटका

CLAT 2022: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्टची नवीन तारीख जाहीर

CTET July 2022: सीटीईटी जुलै परीक्षेचे नोटिफिकेशन कधी ते जाणून घ्या
JEE Main आणि CBSE परीक्षा क्लॅश, वेगळ्या शहरांमध्ये परीक्षा केंद्र घेतल्यास अडचण

अभ्यासक्रम – सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात – अंतिम दिनांक

– बीए-बीएड/ बीएस्सी-बीएड, बीएड-एमएड, लॉ (पाच वर्षे) – १९ मार्च – एप्रिल

– बीपीएड, एमपीएड, एमएड – २२ मार्च – ७ एप्रिल

– बीएड, लॉ (तीन वर्षे) – २४ मार्च – १२ एप्रिल

NBE FMGE 2022: फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर
IOCL: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; १ लाखांपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …