मुंबई : टी २० वर्ल्ड कप आधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाला तीन सामन्यांची टी २० सीरिज खेळायची आहे. या सीरिजला २० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही टीम मोहाली इथे पोहोचल्या आहेत. टी २० सीरिजमधील पहिला सामना मोहली तर दुसरा २३ सप्टेंबर रोजी नागपूरला आणि तिसरा सामना २५ सप्टेंबर रोजी हैदराबादला होणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2022 च्या T20 वर्ल्ड कपआधी पूर्ण जोर लावणार आहे. ऑस्ट्रेलियाने स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरला टी-20 मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, अष्टपैलू मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिस हे दुखापतींमुळे भारत दौऱ्यातून बाहेर पडले आहेत.
पहिला सामना २३ सप्टेंबर रोजी मोहाली इथे खेळवण्यात येणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. ७ वाजता टॉस होईल. स्टार स्पोर्ट्सवर हा सामना पाहता येणार आहे. तर मोबाईलवर Disney+ Hotstar वर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे. याशिवाय मॅचचे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही न्यूज १८ लोकमतला फॉलो करू शकता.
टीम इंडिया – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उप कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, (विकेटपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया टीम – एरॉन फिंच (कर्णधार), शॉन एबॉट, अॅश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या