IIT Kanpur ला माजी विद्यार्थ्याकडून १०० कोटींची देणगी

IIT Kanpur: आयआयटी कानपूरचे (IIT Kanpur) माजी विद्यार्थी आणि इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक राकेश गंगवाल (Rakesh Gangwal, co-founder of Indigo Airlines) यांनी संस्थेला आतापर्यंतची सर्वात मोठी खासगी देणगी दिली आहे. राकेश गंगवाल यांनी आयआयटीमध्ये बांधल्या जाणाऱ्या स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या (School of Medical Research and Technology) बांधकामासाठी १०० कोटींची देणगी दिली आहे. यापूर्वी जेके सिमेंट समूहाने (J K Cement Group) ६० कोटींचे योगदान दिले होते. आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

या देणगीमुळे एसएमआरटीच्या (SMRT)कामाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत संस्थेत मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलही (Multi Super Specialty Hospital) सुरू करण्यात येणार आहे. आयआयटी कानपूरमध्ये सुरू होणाऱ्या स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीमध्ये ((School of Medical Research and Technology))आता अभियांत्रिकीसोबतच वैद्यकीय क्षेत्राच्या उपयुक्ततेनुसार वैद्यकीय अभ्यास (Medical Study) आणि संशोधन (Research) केले जाणार आहे. तसेच उपकरणे तयार करण्यात येणार आहेत. अभ्यास आणि संशोधनासोबतच विविध गंभीर आजारांवर उपचारही केले जाणार आहेत.

शाळा संपून चार तास उलटले तरी मुलं घरी आली नाहीत… शाळेची बस हरवली आणि…

MRVC Recruitment 2022: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती
संस्थेच्या तयारीसाठी संचालकांकडून माजी विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत माजी विद्यार्थी मुकेश पंत आणि हेमंत जालान यांनी १८-१८ कोटी, डॉ. देव जोनेजा यांनी १९ कोटी, आरईसी फाउंडेशनने १४.४ कोटी आणि जेके ग्रुपने ६० कोटींची देणगी दिली आहे.

हेही वाचा :  पदवीधर अधिसभेसाठी जिल्ह्यात १९ मतदान केंद्रे

संचालक प्रा. अभय करंदीकर यांनी सोमवारी मुंबईत इंडिगो एअरलाइन्सचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांची भेट घेतली. राकेश यांनी १९७५ साली संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक केले आहे. प्रोजेक्टबद्दल माहिती मिळताच राकेश यांनी इन्स्टिट्यूट आयआयटी कानपूरला १०० कोटी रुपये दान केले आहेत. सआता लवकरच बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे संस्थेचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांनी सांगितले.

NHM Recruitment 2022: ‘या’ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती
एक हजार एकरमध्ये एसएमआरटी बांधणार
आयआयटी कानपूरमध्ये साधारण १००० एकरमध्ये एसएमआरटी तयार होणार आहे. ज्यामध्ये २४७ एकरमध्ये हॉस्पिटल असणार आहे. त्याच्या रचनेसाठी हेल्थकेअर मॅनेजमेंट आणि हॉस्मॅक कंपनीची (Healthcare Management and Hismaic Company) नियुक्ती करण्यात आली आहे. येथे रुग्णांवरील नवीन औषधांवर संशोधन करून उपचार केले जाणार आहेत.

या विषयांचा अभ्यास
येथे पहिल्या टप्प्यात कार्डिओलॉजी, कार्डिओथोरॅसिक, यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी आणि ऑन्कोलॉजी यासह अनेक पीजी अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, लिव्हर, किडनी आणि कॅन्सर यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी इंजिनीअरिंगच्या मदतीने उपकरणेही येथे विकसित केली जातील. तसेच दुसऱ्या टप्प्यात एमबीबीएससाठी प्रवेश घेतला जाणार आहे.

हेही वाचा :  बंद पडलेल्या मराठी शाळा सुरु करण्यासाठी काय प्लान? दरेकरांचा सरकारला सवाल

KDMC Recruitment: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, जाणून घ्या तपशील
NTRO Recruitment 2022: नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …