गरोदरपणात करीनाने सोडली होती चहा-कॉफी, गर्भधारणेवर होतो विपरीत परिणाम

Caffeine in pregnancy : गरोदरपणात चहा आणि कॉफीच्या सेवनाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. गरोदर महिलांनी चहा, कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पेयांचे सेवन करावे की करू नये याबाबत अनेक संभ्रम असतात. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने अलीकडेच सांगितले की तिने तिच्या गरोदरपणात कॅफिनचे सेवन पूर्णपणे बंद केले होते. याऐवजी करीना कपूरने सकाळी उठल्यावर अगदी रिकाम्यापोटी 2 पदार्थांच आवर्जुन सेवन केलं.

करीना कपूरने 2016 मध्ये तैमूरला आणि 2021 मध्ये जहांगीरला जन्म दिला. दोन मुलांचं उत्तम संगोपन करणारी करीना कपूर खानने गर्भवती महिलांसाठी काही आरोग्यदायी आहाराच्या टिप्स शेअर केल्या आहेत. करीना कपूरने ‘करीना कपूर खानचे प्रेग्नन्सी बायबल: द अल्टीमेट मॅन्युअल’ (Kareena Kapoor Khan Pregnancy Bible The Ultimate Manual for Moms-To-Be) हे प्रख्यात आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ ऋजुता दिवेकर (nutritionist Rujuta Diwekar) यांच्या इनपुटसह लिहिले आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

करीनाची पोस्ट

​गरोदरपणात करीनाने नाष्ट्यामध्ये घेतले हे पदार्थ

गरोदरपणात दिवसाची सुरूवात चांगली आणि हेल्दी होणे महत्वाची असते. अशावेळी काय खावं हा प्रश्न प्रत्येक गरोदर स्त्रीसमोर असतो. अशावेळी करीना कपूर मदत करते. तिच्या डाएट प्लॅनबद्दल बोलताना करीना म्हणाली, “जेव्हा मी माझी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मला सकाळी सर्वात आधी एक केळ खाण्याचा सल्ला दिला आणि मी त्या सल्ल्याचे पालन केले.

केळ हे लोह आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे आणि मी गरोदरपणात दररोज केळीसोबत 5 बदामांचा नाश्ता केला. मी हा नाश्ता नेहमी खाते आणि गरोदरपणात आणि गर्भधारणेनंतरही खात राहिलो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे करीना हा डाएट फॉलो करते.

(गरोदरपणात स्कूटी चालवण्याची आवड पडू शकते भारी, डॉक्टरांनी सांगितलं, गर्भातील बाळासोबत काय होऊ शकतं?)

​गरोदरपणात सोडली चहा – कॉफी

करीना कपूरने सांगितले की, 2016 मध्ये तिच्या पहिल्या गरोदरपणात तिने कॅफिनयुक्त पेये पिणे सोडले होते. सहसा करीना सकाळी तिच्या नाश्त्यासाठी पोहे, उपमा किंवा दोन इडल्या खाते. चहा आणि कॉफीचं सेवन अजिबात करत नाही. करीनाला सकाळी पारंपारिक भरलेला भारतीय नाष्टा खायला आवडतो. तैमूरच्या काळात मी सर्व कॅफीन घेणे बंद केले. कारण मला 100 टक्के बरे व्हायचे होते, असं करीना सांगते.

कॅफिनबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “माझ्या दुस-या गरोदरपणातही कॅफीनचे सेवन खूपच कमी होते. पण मी सकाळी अर्धा कप चहा प्यायचे.

​गरोदरपणात कॅफीनमुळे होत नुकसान

  • कॅफीनयुक्त पेय घेतल्यामुळे म्हणजे चहा आणि कॉफीचे सेवन केल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या जाणवते.
  • कॅफिनच्या सेवनामुळे गर्भवती महिलांमध्ये वारंवार लघवी होऊ शकते.
  • आईशिवाय कॅफिनचा बाळावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
  • चहा-कॉफी प्यायल्यानेही गर्भाच्या विकासात समस्या निर्माण होतात.
  • कॅफीनचे सेवन करणाऱ्या महिलांना जन्मत: कमी वजनाची समस्या देखील होऊ शकते.

(शशांक केतकरने वेदातील ‘हे’ नाव दिलं मुलाला, अर्थ वाचून तुम्हालाही वाटेल खास)

कॉफी-चहाचं सेवन केल्याने बाळाच्या रंगावर परिणाम होतो?

गरोदरपणात चहा-कॉफीचा सेवनाचा बाळावर परिणाम होतो ह गर्भधारणेतील एक मिथक आहे. यात अजिबात तथ्य नाही. डॉक्टर म्हणतात की मुलाचा रंग कसा असेल, ते खाण्यापिण्यावर अवलंबून नाही. कमी किंवा जास्त कॉफी प्यायल्याने न जन्मलेल्या मुलाच्या रंगावर परिणाम होत नाही. मात्र, जर तुम्ही कॉफीचे प्रमाण जास्त प्यायले तर ते आई आणि गर्भाला हानी पोहोचवू शकते. याशिवाय मुलांच्या रंगाबद्दल बोलायचे झाले तर ते पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या रंगांवर अवलंबून असते. त्याचा खाण्यापिण्यावर कोणताही परिणाम होत नाही.

​कॉफीमध्ये किती प्रमाणात असते कॅफिन

कॉफी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते आणि प्रत्येक प्रकारच्या कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण वेगळे असते. उदाहरणार्थ, एका कप कॉफीमध्ये 135 मिलीग्राम कॅफिन असते. त्याच वेळी, इन्स्टंट कॉफीबद्दल बोलायचे तर, एका कपमध्ये 76-106 मिलीग्राम कॅफिन असते. याव्यतिरिक्त, एका कप डिकॅफिनेटेड इन्स्टंट कॉफीमध्ये सुमारे 5 मिलीग्राम कॅफिन असते



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

मोठी बातमी!! शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाची नोटीस

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : सत्तातरानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (eknath shinde) – …

करिनाच्या सुंदर सौंदर्याचं रहस्य उघड, ऋजुता दिवेकरांनी सांगितले ‘हे’ घरगुती उपाय

बॉलिवूडच्या सर्व सुंदर अभिनेत्रींनी पैकी एक अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. पण बेबोच्या सदैव चमकणाऱ्या त्वचेमागे …