20 वर्षांचा झाला अक्षय कुमारचा लेक; दिसतोय फारच हॅन्डसम

मुंबई, 16 सप्टेंबर-  बॉलिवूड कलाकारांप्रमाणे त्यांची मुलेसुद्धा तितकीच चर्चेत असतात. अलीकडे अनेक स्टारकिड्स सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच या स्टार किड्सचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मात्र एक स्टारकिड नेहमीच मीडियापासून दूर असतो. तो स्टारकिड इतर कुणी नसून बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा लेक आरव कुमार होय. आरव आज आपला विसावा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आई ट्विंकलने लेकासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचा लेक आज तब्बल वीस वर्षांचा झाला आहे. मीडियापासून नेहमीच दूर राहणार आरव आज चांगलाच चर्चेत आला आहे. आई ट्विंकल खन्नाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आरवचे खास फोटो शेअर करत एक इमोशनल पोस्ट लिहली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये आरव रंगीबेरंगी फुगे घेऊन सुंदर असं हास्य करताना दिसून येत आहे.

ट्विंकल खन्ना पोस्ट-
…आणि तो 20 वर्षांचा झाला! ते उचलणे खूप कठीण आहे, परंतु शेवटी ते सोडणे देखील कठीण आहे. अडचण अशी आहे की आपण त्यांच्या अस्तित्वाचा प्रत्येक ब्लॉक तयार करतो आणि लहान असताना आपल्याला योग्य वाटेल तसे ते एकत्र करतो. आपण वर्षानुवर्षे हे करतो आणि आपल्याला त्याची सवय होते. पण आपण हे विसरतो की ते ब्लॉक्स शेवटी त्यांचेच आहेत. हे थांबवणे कठीण आहे पण मला अभिमान आहे की हा अद्भुत मुलगा त्या ब्लॉकसह काय बनवत आहे.’ अभिनेत्रीने लेकाला शुभेच्छा देत, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

(हे वाचा:Malaika-Arjun: मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या बहिणीला दिलं खास गिफ्ट; किंमत वाचून व्हाल थक्क )
आरव कुमार हा अशा स्टारकिड्सपैकी एक आहे जो प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत करतो. त्याला कॅमेऱ्यासमोर येणं फारसं रुचत नाही. अक्षय कुमारने एका टीव्ही शोमध्ये खुलासा करत सांगितलं होतं कि, आरवला लाइमलाईटमध्ये यायला अजिबात आवडत नाही. तसेच त्याला माझा वशिला द्यायला अर्थातच तो अक्षय कुमारचा मुलगा आहे हे सांगणं पसंत नाहीय. आज आरव आपला विसावा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रेटी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या बहिणीला दिलं खास गिफ्ट; किंमत वाचून व्हाल थक्क

मुंबई, 16 सप्टेंबर-   बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्स अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सतत चर्चेत असतात. दोघेही …

आर्यन खानच्या प्रेमात पडली प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री; शेअर केली पोस्ट

मुंबई, 16 सप्टेंबर-   बॉलिवूड किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान गेल्या …