मला मुलांना शिस्त लावायचीय, पण घरातले… आईला पेचात पाडणारी ही व्यथा, अशावेळी काय कराल?

लहानपणापासूनच मुलांवर संस्कार होणे अतिशय आवश्यक असते. मुलांना शिस्त लावणे ही फक्त पालकांचीच जबाबदारी नाही तर कुटुंबातील इतर व्यक्तींची देखील जबाबदारी आहे. एकज्ञ कुटूंब पद्धत असेल तर मुलं प्रत्येकाला बघून काही ना काही शिकत असतं. मग घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असोत किंवा काका-आत्या. कारण मुलं प्रत्येकाचं अनुकरण करत असतात. अशावेळी मुलांना शिस्त लावणे खूप कठीण होते.

मुलांना शिस्त लावणे ही फक्त आईचीच जबाबदारी नाही, तर संपूर्ण कुटुंबाची आहे. कुटुंबातील प्रत्येकाने आपल्या समोर एक लहान मुलं वाढत आहे. त्याचा विचार करून वागलं आणि बोललं पाहिजे. विभक्त कुटूंब असेल तेव्हा ही पालकांनी दोघांनी मिळून मुलांना शिस्त लावायला हवी. मुलांना शिस्त लावताना अनेक मातांना घरच्यांचा विरोध किंवा टोमणे ऐकावे लागतात. अशावेळी अशा मातांनी काय करावं? (फोटो सौजन्य – iStock)

​सर्वांशी संवाद साधा

सर्वात अगोदर त्या आईने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधायला हवा. आपलं मुलं जर बिघडत असेल किंवा त्याला फक्त शिस्त लावायची असेल तर प्रत्येकाला आपल्या डोक्यातील विचार सांगायला हवा. राग राग न करता आजी-आजोबांशी बोलायला हवं. कारण आजी-आजोबांच प्रेम महत्वाचं असतं. याच प्रेमातून खूप चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  भिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक

(वाचा – Normal Delivery Stitches: नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?))

​आईचे म्हणणे मुलांसाठी महत्वाचे

मुलांना शिस्त लावताना आईचा शब्द हा मुलासाठी महत्वाचा असायला हवा. तेव्हा तुम्ही सर्वांना आई काय सांगते हे समजून घ्यायला सांगा. प्रत्येकाने आईच्या मताशी सहमती दाखवली तर ते मुलं देखील आईचं म्हणणं सहज ऐकेल.

(वाचा – गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? वयानुसार काय जाणवतात समस्या)

पॅरेंटिंग टिप्स

​ मोबाइलची सवय आजी-आजोबांमुळे लागते

मुलं आई-वडिलांचा फोन घेताना विचार करतात पण आजी-आजोबांचा फोन हा त्यांना आपलाच वाटतो. अशावेळी मुलांना आणि आजी-आजोबांना तुम्ही प्रेमाने समजवा. स्क्रिन टाईमची मर्यादा ही हवीच. संवादाने अनेकदा प्रश्न सुटतात.

(वाचा – गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर))

​आईचा मुलांशी स्ट्राँग बॉन्ड महत्वाचा

आजू-बाजूला कितीही नकारात्मक किंवा चुकीचं वातावरण असलं तरीही मुलाचा आईशी बाँड अतिशय महत्वाचा आहे. अशावेळी तुम्ही मुलाशी प्रेमाचं नातं निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. मुलाला कुणाबद्दलही नकारात्मक गोष्टी न सांगता प्रत्येकातील चांगले गुण हेरायला मुलाला शिकवा. यामुळे तुमचं वेगळेपण अधिक अधोरेखित होईल.

हेही वाचा :  पूजा सावंत 'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च सांगितला लग्नाचा हटके प्लॅन

(वाचा – मुकेश आणि नीता अंबानी यांनी मुलांना दिला महत्त्वाचा धडा, ती एक गोष्ट ठरली आयुष्याची गुरुकिल्ली)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …