Heat Wave Alert : पुढील तीन दिवस महत्त्वाचे… उष्णतेचा कहर, पारा 40 अंशाच्यावर जाणार

Heat Wave Alert : देशात अवकाळी पावसानंतर आता उष्णतेचा कहर दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) इशारा देताना म्हटलेय, देशातील अर्ध्या भागात तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम भारत आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये पुढील 72 तास कमाल तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होईल. तर महाराष्ट्रात विदर्भ चांगलाच तापलाय. मुंबई आणि ठाणे येथील तापमानात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातही उन्हाचे चटके बसत आहेत.

देशभरात तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या. येत्या तीन दिवसात उष्णतेचा झळा चांगल्याच जाणवू शकतात. उष्णतेचा कहर दिसून येणार आहे. दुपारी शक्यतो घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पार गेले आहे. त्यामुळे कपाळावरचा घाम, डोक्यावर कडक सूर्यप्रकाश आणि वाढता पारा यामुळे लोकांच्या घशाला कोरड पडत आहे. 

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 15 एप्रिल ते जून या कालावधीत मध्य, पूर्व आणि उत्तर-पश्चिम भारतातील बहुतांश भागात उष्णतेची लाट नेहमीपेक्षा जास्त येण्याची शक्यता आहे. कमाल तापमानातही वाढ होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांत देशभरात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढू शकते.

हेही वाचा :  मुंबईत प्रदूषणाची भयानक स्थिती; 461 बांधकामांना नियम पाळण्याची नोटीस

48 तासांत देशभरात उष्णतेचा कहर

देशात येत्या 48 तासांत उष्णतेने कहर पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि बिहारच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विशेषत: 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत मध्य, पूर्व आणि उत्तर-पश्चिम भारतातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विशेषत: देशाच्या मध्यवर्ती भागात, पश्चिम-पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडसह लगतच्या भागातही तापमानात सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.

 पारा 45 अंशांच्या वर जाण्याची भीती

मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, अंतर्गत महाराष्ट्र, ओडिशा आणि तेलंगणामध्ये कमाल तापमान 40-42 अंशांच्या दरम्यान आहे. दुसरीकडे, जम्मू, काश्मीर, उत्तर-पूर्व, पूर्व भारत आणि किनारी आंध्र प्रदेशमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा 2-4 अंशांनी जास्त आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारत आणि पूर्व भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या तीन दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होईल. 

हेही वाचा :  Sallekhana Vidhi : सल्लेखानाची प्रथा असते तरी काय? जैन समाजात का आहे महत्त्व?

महाराष्ट्रात पावसाची शक्यता

दरम्यान, उत्तर भारतात पारा वाढणार असला तरी महाराष्ट्रात पुढील चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात उष्णतेचा तडाखा वाढला

विदर्भ चांगलाच तापला आहे. चंद्रपूर येथे काल उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले. 43.2 डिग्री सेल्सियस इतसे तापमान हे या मोसमातील सर्वाधिक होते.  तर भंडाऱ्यातही पारा 42 अंशांवर होता. नागपूरातही 41 अंश सेल्सिअस तापमान होते.

चंद्रपूर – 43.2
नागपूर – 41.0
अकोला – 40.3
अमरावती – 41.4
गोंदिया – 40.4
वर्धा – 42.2
यवतमाळ – 40.5
वाशिम – 39.8



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …