रेखासोबत गुपचूप लग्न ! घरात मोठा गदारोळ, विनोद मेहरांची प्रेम कहाणी अधुरीच राहिली

Rekha and Vinod Mehra: बॉलीवूडला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे अभिनेत्री रेखा. कांजीवरम साडीत सुंदर दिसणाऱ्या रेखाचे आयुष्य रहस्यामय आणि गुढ आहे. रेखा अनेक वेळा प्रेमात पडली आणि तिने लग्नही केले पण अजूनही अविवाहित आहे.अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की रेखा आणि विनोद मेहरा प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. मात्र, रेखाने एका चॅट शोमध्ये या सर्व गोष्टी खोट्या असल्याचे सांगितले होते.
अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता विनोद मेहरा यांनी बाल कलाकार म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर 70 च्या दशकात मुख्य अभिनेता बनले. त्यांचे व्यावसायिक जीवन उत्तम होते, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार होते. त्याला आवडलेली अभिनेत्री त्याच्या आईने नाकारली होती. त्यानंतर घरतील मंडळीच्या पसंतीचे त्यांनी लग्न केले. (फोटो सौजन्य :- @big_fan_of_rekha, @retrobollywood)

100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले

100-

विनोद मेहराच्या ‘परदे के पीचे’ या चित्रपटातून योगिता बालीचं पदार्पण झालं. त्यानंतर रेखासोबत ‘आयलान’, ‘अमर प्रेम’, ‘लाल पत्थर’, ‘अनुराग’ सारख्या चित्रपटात ते दिसले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये त्याने मुख्य अभिनेता म्हणून काम केले.

हेही वाचा :  हातात काठी घेऊन जंगलात अचानक उभा ठाकला विवस्त्र Wolf Man; समोर येताच खळबळ

विनोदसोबतच्या लग्नाची अफवाच

विनोदसोबतच्या लग्नाची अफवाच

रेखाच्या लग्नाबद्दल आणि प्रेमाबाबत अनेक कथा ऐकल्या आणि वाचल्या आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये रेखा आणि विनोद मेहरा यांच्या लग्नाचंही म्हटलं होतं. पण प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवालच्या शोमध्ये रेखाने या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते. 2004 मध्ये, सिमी गरेवालच्या शोमध्ये रेखाने विनोद मेहरा आणि त्यांच्या नात्याला जवळचे मित्र म्हणून नाव दिले. जेव्हा सिमीने रेखाला विचारले की, ‘तू 1973 मध्ये विनोद मेहरासोबत लग्न केलेस का? जवळपास 2 महिने ती त्याच्याशी लग्नाच्या बंधनात अडकली होती का? या प्रश्नाचे उत्तर देताना रेखा म्हणाली, ‘नाही, तुझे असे म्हणायचे आहे की मी फारुख अब्दुल्लाशी लग्न केले होते. कोणीही काहीही म्हणू शकते. पण होय, तो खूप चांगला व्यक्ती होता.

विनोद मेहरा आणि रेखा

विनोद मेहरा यांनी केली होती तीन लग्नं

विनोद मेहरा यांनी केली होती तीन लग्नं

विनोद मेहरा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आईच्या मर्जीने मीना ब्रोकासोबत पहिले लग्न केलं होतं. मात्र, त्यांनी घटस्फोट झाला. यानंतर ते बिंदिया गोस्वामीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न केले. दोघांच्या नात्यात कटुता आली आणि तिने विनोदला सोडले. यानंतर विनोदने किरणशी लग्न केले आणि शेवटच्या क्षणापर्यंत तिच्यासोबत राहिला. मात्र, 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने विनोद यांचे निधन झाले.
(वाचा :- Kiss Day 2023: काय आहे ‘6 सेकंड किस थेअरी’ संकल्पना ऐकूनच हादरुन जाल, हेल्दी रिलेशनशिप नक्की ट्राय करा)

हेही वाचा :  मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि जलद होणार; लोकलसाठी 789 कोटी, कोणाला फायदा होणार?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …