Wrestlers Protest: “ब्रिटिशांप्रमाणे हे सरकारही…,” आंदोलनात मुलींवर होणारे अत्याचार पाहून महावीर फोगाट संतापले

Wrestlers Protest: “ब्रिटिशांप्रमाणे हे सरकारही…,” आंदोलनात मुलींवर होणारे अत्याचार पाहून महावीर फोगाट संतापले


Mahavir Phogat on Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) महिला कुस्तीगिरांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याविरोधात कुस्तीवीर आंदोलन करत असून, बृजभूषण यांना अटक करण्याची मागणी आहे. दरम्यान, नुकतंच दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) कुस्तीगिरांना मिळालेल्या वागणुकीवरुन सध्या देशभरात संताप आहे. त्यातच आंदोलनात सहभागी फोगाट बहिणींचे वडील आणि माजी कुस्तीगीर महावीर फोगाट (Mahavir Phogat) यांनीही सरकारला इशारा दिला आहे. देशातील जनता ब्रिटिशांप्रमाणे या सरकारलाही घालवेल असा इशारा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगाट यांनी दिला आहे. 

“मुलींची स्थिती पाहता न येण्यासारखी आहे. या देशातील जनता ज्याप्रमाणे ब्रिटीशांना हाकललं, त्याप्रमाणे या सरकारलाही घालवेल,” असं महावीर फोगाट म्हणाले आहेत. हरियाणामधील आपल्या गावात बोलताना त्यांनी हे विधान केलं. 

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कुस्तीगिरांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि हस्तक्षेपाबद्दल बोलताना फोगाट म्हणाले की, “शेतकरी नेत्यांना आमच्या मुलींच्या भावना समजल्या आहेत. आता संपूर्ण देश एकत्र येऊन याला निर्णायक चळवळीत रूपांतरित करेल”.

गाव पंचायतीपासून ते खाप आणि सामाजिक, शेतकरी संघटना, देशातील लोक एका मोठ्या चळवळीचे साक्षीदार ठरणार आहेत असंही यावेळी ते म्हणाले. “मी सर्व गोष्टी पणाला लावून माझ्या मुलींना पदकं जिंकतील इतकं समर्थ बनवलं आहे. पण आज त्यांची स्थिती पाहू शक त नाही. दुर्दैवाने खेळाडूंनी आपली पदकं गंगेत टाकण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. शेतकरी नेत्यांना त्यांच्या भावना समजल्या असून, आता संपूर्ण देश अशाप्रकारे एकत्र येईल की सरकारला त्यांच्यासमोर झुकावं लागेल. जर सरकारने याप्रकरणी पुढाकार घेतला नाही तर देशातील लोक ब्रिटीशांना ज्याप्रकारे हाकललं त्याप्रमाणे हे सरकार उलथवून टाकेल,” असा इशारा महावीर फोगाट यांनी दिला आहे.

हेही वाचा :  माहितीये ना? तुमच्या Gifts वरही Income Tax विभागाची नजर; कधी आकारला जातो कर? जाणून घ्या

दरम्यान महिला कुस्तीगिरांना मिळणारी वागणूक पाहत त्या कुस्ती खेळणं सोडून देतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कनिष्ठ खेळाडूंचे भविष्य आता अंधकारमय होते आगे असंही यावेळी ते म्हणाले आहेत. “आता सरकारला झुकावं लागेल आणि बृजभूषण सिंह यांना जेलमध्ये जावं लागेल अशी चळवळ सुरु होईल,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह भारतातील अव्वल कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जानेवारीमध्ये दिल्लीतील जंतरमंतर येथे एकत्र आले होते. ब्रृजभूषण सिंह यांना पदावरुन हटवण्याची आणि त्यांना अटक करण्याची कुस्तीगिरांची मागणी आहे. गंगेत पदकं विसर्जित गेल्यानंतर समजूत काढल्यानंतर कुस्तीगीर मागे फिरले होते. यावेळी त्यांनी सरकारला बृजभूषण सिंह यांना अटक करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे. 



Source link