मै नही तो कौन बे? Mahindra XUV700 ला कारप्रेमींचा तुफान प्रतिसाद, Features पाहून प्रेमातच पडाल

Mahindra XUV700 Sales 1 Lakh Units: एक असतात कारप्रेमी आणि दुसरे असतात कारचे ब्रँडप्रेमी. म्हणजे जग इकडचं तिकडे जावो, ही मंडळी त्यांच्या आवडीचे ब्रँड सोडून इतर कारच्या ब्रँडकडे पाहतही नाहीत. खरंतर व्यावसायिक भाषेला अशा ब्रँडप्रेमींना Loyal Customers असं म्हणतात. भारतीय Auto जगतामध्ये Mahindra and Mahindra या ब्रँडला असेच काही अफलातून ग्राहक लाभले आहेत. कारण, या कंपनीच्या Mahindra XUV700 या मॉडेलला ग्राहकांनी इतकं प्रेम दिलं आहे की 2 वर्षात या कारचे 1 लाखांहून अधिक मॉडेल विकले गेले आहेत.

पुण्यातील चाकण येथे असणाऱ्या प्लांटमधून महिंद्राच्या वतीनं ही एक्सयुव्ही700 तयार करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कारला SUV सेगमेंटपासून टाटा सफारीपर्यंत बऱ्याच ब्रँड्सनी टक्करही दिली. पण, शेवटी महिंद्रा ती महिंद्राच… मै नही तो कौन बे… अशाच अविर्भावात ही कार सर्वांनाच पिछाडीवर टाकताना दिसत आहे.

काय आहेत या कारचे फिचर?  

पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारच्या व्हेरिएंटमध्ये येणाऱ्या या कारला 200hp पॉवर आणि 380 nM टॉर्क जनरेट करतो. तर, कारचं डिझेल इंजिन 2 प्रकारांमध्ये येतं. जिथं 155 Hp ची पॉवर आणि 360 nM  टॉर्क जनरेट करतं आणि दुसरं 185hp ची पावर आणि साधारण 420 nM चा टॉर्क जनरेट करतं.

हेही वाचा :  Public Wi-Fi वापरताना घ्या काळजी, अन्यथा हॅकर्सकडे जातील महत्वाचे डिटेल्स

या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे ही कार 5 सेकंदांत 0-60 किमी इतका प्रचंग वेग पकडते. कारमध्ये तुम्हा 360 डिग्री कॅमेरा, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, कंसोल, इंफोटेन्मेंट सिस्टीम असे पर्यायही मिळतात. याशिवाय कारमध्ये मिळणारे फिचर्स….

  • 3D Sound System
  • ESP
  • Traction Control
  • Hill Hold
  • Brake Asist
  • LED DRLs 
  • LED Headlamps
  • Apple CarPlay
  • Android Auto Connectivity
  • TPMS
  • 7 Airbags
  • 12 Speakers

किमतीविषयी सांगावं तर, 2021 मध्ये XUV500 च्या ऐवजी कंपनीनं XUV700 बाजारात आणत तिची किंमत सर्वांच्या खिशाला परवडेल अशा टप्प्यात ठेवली. या एसयुव्हीची एक्स शोरुम किंमत 11.99 लाख रुपये इतकी होती. पण, दरवाढीनंतर ही किंमत बेस मॉडेलसाठी 14.01 लाख आणि टॉप व्हेरिएंट 26 लाखांपर्यंत पोहोचली. भारतीय रस्त्यांची अप्रतिम जाण असणाऱ्या महिंद्रानं तयार केलेल्या या कारची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही हेच खरं.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …