हातात काठी घेऊन जंगलात अचानक उभा ठाकला विवस्त्र Wolf Man; समोर येताच खळबळ

Wolf Man: एक घनदाट जंगल असतं. त्या जंगलात काही असे वन्यजीव असतात ज्यांच्या अस्तित्वामुळं जंगलात येणाऱ्या प्रत्येकालाच धडकी भरते. या वन्यजीवांमध्ये काही प्रजाती अशाही आढळतात ज्यांचा चेहरा, मनुष्याशी मिळताजुळता असतो, अशा रंजक गोष्टी एखाद्या सहलीवर तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं सांगितल्या असतील. टाचणी पडल्यासही तिचा आवाज येईल इतकी शांतता, काळाकुट्ट अंधार, वाऱ्याचा घोंगावणारा आवाज आणि मध्येच दुरून कुठूनतरी ऐकू येणारा पायाखाली पानं चुरगळल्याचा आवाज… तुम्ही कधी अनुभवलाय का? 

इतक्या सर्व घडामोडी जगभरात घडत असतानाच एकाएकी रानावानातल्या गोष्टी चर्चेत का आल्या असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सध्या नजरा वळवणारं एक वृत्त. काही परदेशी माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार जर्मनीमध्ये ‘वुल्फ मॅन’ Wolf Man काहींच्या नजरेस पडला आहे. मध्य जर्मनीतील हार्ज पर्वतरांगांमधील भागामध्ये हा जंगली मानव दिसल्याचा दावा करण्यात आला असून, त्याचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

कोण आहे तो माणूस? 

पर्वतरांगांमध्ये दिसलेला तो माणूस तिथं मागील पाच वर्षांपासून वावरत असल्याचं सांगण्यात आलं. त्याच भागातून जाणाऱ्या दोन पर्यटकांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनी त्याचा फोटो टीपला. विवस्त्र असणाऱ्या त्या माणसाच्या हातात एक मोठी काठी होती असं त्यांनी सांगितलं. फोटोमध्येही हे लगेचच लक्षात आलं. 

हेही वाचा :  क्रॉप शर्ट घालून मलायका अर्जुन कपूरसोबत पोहचली डेटला

जंगलांमध्ये आढळून आलेल्या या व्यक्तीचा फोटो जगासमोर आल्यानंतर आता Wolf Man विषयीचे अनेक तर्कवितर्क चर्चेचा विषय ठरत आहेत. या प्रकरणी अनेक मतमतांतरंही पाहायला मिळत आहेत. जर्मनीमध्ये असणाऱ्या हार्ज पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या जंगलातील निर्मनुष्य महालाजवळ एका माणसाला पाहिलं गेलं. त्याच्या हातात एक लाकडी भालासदृश वस्तू होती असंही प्रथमदर्शींनी सांगितलं. या माणसाला प्रथमत: पाहणाऱ्या 31 वर्षीय जीना वीस आणि 38 वर्षीय टोबी यांनी कसाबसा त्याचा फोटो टीपल्याचं सांगण्यात येत आहे. 

…आणि तो दिसला 

वीसच्या सांगण्यानसार ज्यावेळी ते दोघं वाळूच्या गुहेपाशी पोहोचले तितक्यातच तिथं त्यांना गुफेच्या सर्वात उंच ठिकाणी तो माणूस दिसला. साधारण चाळीशीतल्या त्या माणसाच्या हाती एक मोठं लाकडी अस्त्र होतं. वीस यांच्या दाव्यानुसार जवळपास 10 मिनिटं त्यांना या माणसाठी संघर्ष करावा लागाला. वुल्फ मॅनबद्दलची ही माहिती कितपत खरी याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, त्यानिमित्तानं हिममानव, जंगली मानव, येती यांच्याविषयीच्या चर्चा मात्र पुन्हा सुरु झाल्या आहेत असंच म्हणावं लागेल. 

हेही वाचा :  Viral Video : पैशांचा माज! मर्सिडिज मालकाचं महिलेसोबत वाईट वर्तन, पाहा VIDEO



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …