(सर्व सौजन्य – @geneliad Instagram)
साडीतील मादक सौंदर्य
जेनेलिया डिसूझाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने सुंदर नाजूक नक्षी असलेली साडी नेसली आहे. यावेळी सौंदर्य खुलवण्यासाठी ऑफ-व्हाइट कलरची साडी घातली होती, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर जेजे वलाया यांच्या कलेक्शनमधून निवडली आहे. यासाडीवर खूपच नजूक नक्षी दिसत आहे.
(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)
सिल्कच्या धाग्यात बनवलेली नाजूक साडी
जेनेलिया नेसलेली ऑफ-व्हाइट रंगाची साडी पूर्णपणे सिल्क फॅब्रिकपासून बनलेली होती. यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसत होती. या साडीच्या काठाला फुलांची डिझाइन करण्यात आली होती. त्या तसेच संपूर्ण साडीवर वेलींच्या नक्षी काढण्यात आले आहेत.
(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)
ब्लाऊजने वेधले सर्वांचे लक्ष
या साडीवर जेनेलियाने टिश्यू सिल्कपासून बनवलेल्या ब्लाऊजचा वापर केला. यामुळे तिचा लूक खूपच सुंदर दिसत होता. या ब्लाऊजला थ्री फोथ हात देण्यात आले होते. या सुंदर ब्लाऊजला व्ही स्टाईलमध्ये खोल कट नेकलाइन होती. या रॉयल लूक मध्ये जेनेलिया खूपच सुंदर दिसत आहे.
(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)
जेनेलियाचा मेकअप
यावेळी जेनेलियाने एथनिक लूकसह पार्टी मेकअप केला होता. यावेळी तिने डोळ्यांच्या मेकअपसाठी पीच आणि चमकदार आयशॅडोचा वापर केला आणि ओठांवर ऑरेंज रंगाची लिपस्टिक लावली होती. तर एक सुंदर टिकली लावून तिने तिचा लूक परिपूर्ण केला आहे. तुम्ही देखील असा लूक करु शकता.
(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)
अॅक्सेसरीज
या सुंदर साडीवर जेनेलियाने कोणतीच कसर सोडली नव्हती. यावेळी तिने नकात नथ, हातात बंगड्या घातल्या होत्या. कानातल्या झुमक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर केसातील गजऱ्याने चाहत्यांचा जीवच घेतला.
(वाचा :- नीता अंबानींचा काळ्या साडीत ‘रॉयल लूक’, प्रिन्स चार्ल्सच्या भेटीचे फोटो व्हायरल,चाहत्यांनीही रोखले श्वास)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या