Foods for blood vessels : शरीरातील सर्व कमजोर नसा एका आठवड्यात होतील मजबूत, आजपासूनच सुरू करा ‘ही’ 5 कामं..!

मानवी शरीर हे रक्तवाहिन्या आणि धमन्यांच्या एका जटिल मार्गाने बनलेले आहे. मानवी शरीरात इतक्या नसा असतात की त्या काढून एकत्र जोडल्या तर त्या सुमारे 100,000 मैलांपर्यंत पसरू शकतात. शरीरातील धमन्या आणि नसा हृदयापासून शरीराच्या ऊतींकडे रक्त पुढे नेण्यासाठी आणि मागे घेऊन जाण्यासाठी जबाबदार असतात. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच रक्तवाहिन्याही निरोगी ठेवणे गरजेचे आहे. निरोगी रक्तवाहिन्या मऊ आणि लवचिक असतात, ज्यामुळे रक्त सहज वाहून पुढे जाऊ शकते. नसांच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास त्यांच्यामध्ये घाण साचू शकते, ज्यामुळे त्या कमकुवत आणि अस्वस्थ होण्याचा धोका वाढू शकतो.

काहीवेळा नसा घट्ट किंवा कडक झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका (heart attack) आणि हार्ट स्ट्रोकचा (heart stroke) धोका वाढू शकतो. प्रश्न असा आहे की नसा मजबूत कशा बनवायच्या किंवा बंद नसा उघडण्याचा मार्ग काय आहे? नसा आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी आपण प्रथम शारीरिकरित्या सक्रिय (physically active) असणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, आपण निरोगी आहार घ्यावा. असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन करून तुम्ही नसा निरोगी आणि मजबूत बनवू शकता. (फोटो साभार: istock by getty images)

हेही वाचा :  Mango Vs Papaya : वेटलॉस व डायबिटीज कंट्रोलसाठी पपई आणि आंब्यापैकी कोणतं फळ आहे बेस्ट? 'हा' आहे जबरदस्त ऑपशन!

रंगीत फळे व भाज्या

तुमच्या आहारात वेगवेगळ्या रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश करून तुम्ही नसांच्या आरोग्याला प्रोत्साहन देऊ शकता. यामध्ये बायोफ्लेवोनोइड्स फाइटोन्यूट्रिएंट्स आढळतात जे रक्ताभिसरण क्रिया म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन (blood circulation) सुधारतात. पालेभाज्या रक्तपेशी बनवण्यास मदत करतात. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते ज्यामुळे नसा मजबूत होतात.

(वाचा :- Brain Hemorrhage : नव-याने मारल्यामुळे या मॉडेलला झाला ब्रेन हॅमरेज, झाली अशी विचित्र हालत, जाणून घ्या या आजाराची लक्षणे, कारणे व उपाय!)

लाल मिरची आणि हळद

हजारो वर्षांपासून औषधी उद्देशाने विविध मसाल्यांचा वापर केला जात आहे. हळदीमध्ये अँटी इनफ्लमेट्री गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होण्यापासून बचाव होतो. लाल मिरची ब्लड सर्क्युलेशन उत्तेजित करते आणि रक्तप्रवाह सुरळीत राखण्यास मदत करते आणि निरोगी परिसंचरणास मदत करते.

(वाचा :- Ghee benefits : आयुर्वेद एक्सपर्ट्सचा सल्ला, सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हा’ 1 पदार्थ, आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर पडतील व झटपट होईल वेटलॉस!)

हेही वाचा :  छोट्या पडद्यावरील सुनेचा धमाका, डीपनेक ड्रेसमध्ये हिना खानचा जलवा

जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थ खा

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल सुधारण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉस रक्तवाहिन्या बंद होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. आहारात रिफाइंड ऐवजी संपूर्ण धान्य निवडा आणि खारट चिप्स किंवा गोड कँडीजऐवजी स्नॅक्स म्हणून जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खा.

(वाचा :- Quick Weight loss : आळशी आहात पण झटपट वेटलॉस करायचंय? झोपूनच करा ‘ही’ 5 साधीसोपी कामं, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीराची चरबी!)

मीठ कमी खा

नसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले किंवा प्री-पॅक केलेले अन्नपदार्थ खाणं टाळा कारण त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. डब्बाबंद किंवा पॅकेज्ड केलेले अन्नपदार्थ खरेदी करताना किंवा खरेदी करण्यापूर्वी त्यातील सोडियमची पातळी तपासण्यासाठी लेबल वाचा. जेवणात वरून किंवा जास्त मीठ टाकू नका.

(वाचा :- पुरुषांनो, ‘या’ 1 हार्मोनच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, संभोगातील नावड, बाबा न बनणं, वेळेआधी म्हातारपण या समस्यांना पडाल बळी, झोपण्याआधी खा हे 7 पदार्थ!)

हायड्रेटेड राहा

निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात सुमारे 93% पाणी असते. नसा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे तुमच्या शरीराला जास्त काळ काम करावे लागणार नाही आणि नसांचे कार्य सुलभ होण्यास मदत होईल.

हेही वाचा :  Immunity booster foods : इम्युनिटी होईल 100 पट मजबूत, डाएटिशियनने सांगितले ब्रेकफास्ट, लंच व डिनरमध्ये काय खाणं गरजेचं..!

(वाचा :- Cancer diet: योग्य पद्धतीने खा ‘हे’ 6 अँटी-कॅन्सर पदार्थ, पहिल्याच स्टेजमध्ये टळेल कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …