खरंच की काय! वर्षाअखेरीस लग्नाच्या बेडीत अडकणार ‘बाहुबली’ प्रभास?


मागच्या बऱ्याच काळापासून प्रभासच्या लग्नाची चर्चा आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार ‘बाहुबली’ प्रभास देशातल्या असंख्य तरुणींचा क्रश आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या चाहत्यांमध्ये तरूणींचा संख्याच जास्त असल्याचं दिसून येतं. पण कोट्यवधी तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा हा अभिनेता ‘राधे श्याम’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लग्नाच्या बेडीत अडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. ४२ वर्षीय प्रभासच्या लग्नाबाबत एस्ट्रोलॉजर आचार्य विनोद कुमार यांनी भविष्यवाणी केली आहे. दरम्यान या आधी प्रभासनंही एका मुलाखतीत, ‘बाहुबली’ प्रदर्शित झाल्यानंतर मी लग्न करेल असं कुटुंबीयांना सांगितलं आहे असं म्हटलं होतं.

अभिनेता प्रभासच्या लव्ह लाइफबाबत याआधीही भविष्यवाणी झाली होती. मात्र ती चुकीची ठरली होती. त्यानंतर आता प्रभासच्या लग्नाविषयी भविष्यवाणी करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये बोलताना विनोद कुमार म्हणाले, ‘२०२२ हे वर्ष प्रभाससाठी खूप खास आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याच्या लग्नाचा योग आहे. ऑक्टोबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या काळात प्रभास लग्नबंधनात अडकू शकतो.’

आणखी वाचा- नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड

व्हिडीओ शेअर करताना विनोद कुमार म्हणाले, ‘प्रभास लवकरच लग्न करू शकतो. माझी भविष्यवाणी भारतातील सर्वात हॅन्डसम अभिनेत्याबाबत आहे. जो लवकरच ‘राधे श्याम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जय माता दी.’

हेही वाचा :  आमिर खाननंतर धनुषने पाहिला ‘झुंड’ नागराज मंजुळेंची स्तुती करत; म्हणाला…

आणखी वाचा- ‘भारताचे राष्ट्रपती कोण?’ असा प्रश्न विचारताच प्रसिद्ध अभिनेत्रीची बत्ती गुल; वाचा नेमकं काय घडलं

दरम्यान आगामी काळात प्रभास ‘राधे श्याम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर तो अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम करताना दिसणार आहे. सध्या तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘के’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभासनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःला भाग्यवान मानत असल्याचं म्हटलं होतं.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …