दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nick Bollettieri Death News : आपल्या टेनिस अकादमीतून सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा, आंद्रे अगासी असे महान टेनिसपटू जगासमोर आणणारे महान प्रशिक्षक कोच निक बोलेटिएरी (Nick Bollettieri) यांचे निधन झाले आहे. निक यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास (Nick Bollettieri death) घेतला आहे. त्याच्या निधनाने टेनिस जगतावर शोककळा पसरली आहे.

जागतिक टेनिसमध्ये अव्वल क्रमांकावर राहिलेले अनेक खेळाडू टेनिस जगताला देणारे प्रशिक्षक म्हणून निक यांची ओळख आहे. 2014 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आयएमजी अकादमीने सोमवारी एका निवेदनातून दिलेल्या माहितीत सांगितले की,”आएमजी अकादमीचा पाया म्हणून काम करणारे टेनिस अकादमीचे दिग्गज टेनिस प्रशिक्षक आणि संस्थापक निक बोलेटिएरी यांचे निधन झाले आहे,”   

निक बोलेटिएरी यांनी 1978 मध्ये ‘निक बोलेटिएरी टेनिस अकादमी’ची स्थापना केली. सध्या ही अकादमी आयएमजी (IMG Academy) म्हणून ओळखली जाते. या अकादमीतून अव्वल दर्जाचे बरेच टेनिसपटू जगासमोर आले. प्रतिभावान खेळाडूंमध्ये सुरू असलेली स्पर्धा यावर लक्ष केंद्रित करुन या अकादमीने अनेक हिरे टेनिस जगताला दिले. यामध्ये सेरेना विल्यम्स तिची बहिण विनस विल्यम्स तसंच मारिया शारापोवा, आंद्रे अगासी अशा बऱ्याच स्टार खेळाडूंचाही समावेश आहे. बऱ्याच स्टार टेनिस खेळाडूंनी निक यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. जर्मन टेनिसपटू टॉमी हास याने त्याच्या बालपणीचा फोटो ज्यामध्ये निक आहेत, तो शेअर करत भावूक पोस्ट शेअर केली आहे.


हे देखील वाचा-

हेही वाचा :  विजयी हॅट्रिकसह महाराष्ट्र  खो-खो संघ उपांत्य फेरीत, पश्चिम बंगालवर सात गुणांनी मात



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …