आलिया भट्टने जाहिर केलं मुलीचं नाव, मुलीच्या नावामध्ये दडलाय अनोखा अर्थ… कुणी ठेवलं नाव जाणून घ्या

बॉलिवूडमध्ये नव्याने पालक झालेल्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया – रणबीरच्या मुलीचं नाव काय असू शकतं याबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

आलिया भट्टने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. कपूर आणि भट्ट कुटुंबात एकच आनंद झाला होता. यानंतर सगळ्यांना मुलीचं नाव काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण होती. अखेर आलियाने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आलियाने आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. (फोटो सौजन्य – आलिया भट्ट इंस्टाग्राम / टाइम्स ऑफ इंडिया)

​आलिया भट्टने काय ठेवलं मुलीचं नाव?

आलिया भट्टने मुलीचं नाव ‘राह’ असं जाहीर केलं आहे. आलियाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने बाळाचं नाव जाहीर केलं आहे. आलिया रणबीर या फोटोत दिसत आहेत यांच्यात हातात लेक राह देखील दिसत आहे. या फोटोत बार्सिलोनाच्या जर्सीवर फोकस केला असून युनिसेफ मार्क असलेल्या ड्रेसवर मुलीचं नाव जाहीर केलं आहे.

हेही वाचा :  संजय राऊत आणि संजय निरूपम यांच्यातील जुना वाद महाविकास आघाडीला भोवणार; माघार घ्यायला कुणीच तयार नाही?

(वाचा – इशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म, नाव जे त्यांच्या कुटुंबाला साजेल असंच…. पाहा नावाचा अर्थ)

राहाच्या नावाची पोस्ट

​काय लिहिलंय या पोस्टमध्ये

आलियाने आपल्या या पोस्टमध्ये मुलीच्या नावाचा अर्थ वेगवेगळ्या भाषांमध्ये सांगितला आहे. राहा (तिच्या शहाण्या आणि अद्भुत दादीने निवडलेले) या नावाचे खूप सुंदर अर्थ आहेत… राहा त्याच्या शुद्ध स्वरूपात म्हणजे दिव्य मार्ग, स्वाहिलीमध्ये ती आनंद आहे. संस्कृतमध्ये, राहा हे कुळ आहे. बांगलामध्ये – विश्रांती. पहिल्यांदा हातात धरले – आम्हाला ते सर्व धन्य वाटले! धन्यवाद राहा, आमच्या कुटुंबाला नवी संजीवनी दिल्याबद्दल, असे वाटते की आमचे आयुष्य आताच सुरू झाले आहे.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

कुणी ठेवलं आलियाच्या लेकीचं नाव

आलियाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आलियाने मुलीचं नाव राहा असं ठेवलं आहे. आलियाच्या मुलीला तिच्या आजीने म्हणजे अभिनेत्री नीतू सिंह यांनी नाव दिलं आहे. राहा या नावाची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे.

(वाचा – प्रियंका चोप्राकडून लेकीचा पहिला फोटो शेअर, मालतीच्या नावामागे प्रियंका-निकचा ‘हा’ विचार तुम्हालाही भावेल)

हेही वाचा :  लाल गाऊनमध्ये कियारा अडवाणीचा जलवा, या एका गोष्टीमुळे चाहत्यांनी मात्र व्यक्त केली नाराजी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …