सोशल मीडियावर कुशलला हजारो लोक फॉलो करतात. त्यानं त्याची सोशल मीडिया प्रोफाइल देखील फार उत्तमरित्या मेंटेंन केली आहे. कुशल नेहमीच काही तरी क्रिएटिव्ह त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवू इच्छितो. कुशल जितका उत्तम नट आहे तितकाच तो एक सजग माणूसही आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घडामोडींवर तो त्याचं मत व्यक्त करत असतो. इतकंच नाही कुशलचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व देखील फार उत्तम आहे. प्रत्येक पोस्टवर तो त्याची क्रिएटिव्हिटी दाखवत असतो. तर कधी कधी त्याच्या मनातील भावना देखील तो शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो.
हेही वाचा – Kushal Badrike : ‘माझं सगळं शिकून आणि जगून झालंय’; असं का म्हणतोय कुशल बद्रिके?
कुशल फार चांगला लेखक होऊ शकतो असा विश्वास मराठीतील एका प्रसिद्ध लेखकाला वाटतो आहे. आणि त्यांनीच कुशलला एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. ‘तू सातत्यानं लिहायला हवं’, असं प्रसिद्ध कवी आणि लेखक वैभव जोशी यांनी म्हटलं आहे. नुकतीच कुशलनं त्याच्या जुन्या घराचे फोटो शेअर करत आजच्या आणि जुन्या पिढीचं किती गोष्टी बदलल्या आहेत हे लिहिलं आहे. ती पोस्ट पाहून वैभव जोशी यांनी कुशलला प्रेमाचा सल्ला दिला.

वैभव जोशी यांनी केलेल्या कमेंटवर कुशल देखील प्रचंड खुश झालाय. ‘आई शप्पथ आज तो मेरा दिन बन गया, लव्ह यू दादा’, असा रिप्लाय कुशलनं दिला आहे. सध्या कुशलची पोस्ट अनेकांच्या पसंतीस पडत आहे. तर वैभव यांनी दिलेला सल्ला देखील कुशलनं मनावर घ्यावा असं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या