ब्ल्यू बेबी सिंड्रोम आणि जन्मजात हृदयरोग यांच्यातील संबंध नक्की काय, तज्ज्ञांकडून माहिती

ब्ल्यू बेबी सिंड्रोम मेथिमोग्लोबिनिमिया म्हणून देखील ओळखला जातो. बाळाच्या रक्तामध्ये जेव्हा मेथिमोग्लोबिन असामान्य प्रमाणात असते तेव्हा ही स्थिती उत्पन्न होते. मेथिमोग्लोबिन हा हेमोग्लोबिनचा एक प्रकार आहे जो शरीरातील पेशींपर्यंत प्राणवायू घेऊन जाऊ शकत नाही. प्राणवायूच्या अभावामुळे त्वचा, ओठ आणि नखे निळसर दिसू लागतात. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. प्रदूषित पाण्यात आढळणाऱ्या नायट्रेट्सच्या संपर्कात आल्याने हा आजार होतो. या आजारांमुळे कुटुंब आणि समाजावर होत असलेल्या परिणामांविषयी माहिती देत असतो. डॉ. शिल्पा अरोसकर, कन्सल्टंंन्ट, पेडियाट्रिक्स आणि निओनॅटोलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्याकडून माहिती आम्ही घेतली आहे. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​ब्ल्यू बेबी सिंड्रोम म्हणजे काय?​

​ब्ल्यू बेबी सिंड्रोम म्हणजे काय?​

नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे की, जन्मजात हृदयरोग असलेल्या मुलांमध्ये हृदय आणि श्वसन यंत्रणा कमजोर झालेली असल्याने त्यांना ब्ल्यू बेबी सिंड्रोम होण्याची शक्यता जास्त असते. जन्मजात हृदयरोग असलेल्या मुलांच्या शरीराला प्राणवायू पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही, अशात जर नायट्रेट्सशी संपर्क आला तर समस्या अधिक बिकट होते आणि ब्ल्यू बेबी सिंड्रोम होतो.

हेही वाचा :  घरात मांजर पाळताय? पालिकेकडून आलेली नवी नियमावली एकदा व्यवस्थित वाचा

​जीवावर बेतू शकते​

​जीवावर बेतू शकते​

भारतात दरवर्षी जवळपास २ लाख मुलांना जन्मतःच हृदयरोग असतो. या मुलांना जर ब्ल्यू बेबी सिंड्रोम झाला तर मुलांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर खूप घातक परिणाम होऊ शकतो. बाळाच्या शरीरात गंभीर गुंतागुंत होऊन जीवावर देखील बेतू शकते.

(वाचा – शरीरातील ५ आजार दूर करते हे पाणी असणारे फळ, उन्हाळा सुरू होताच घ्या डाएटमध्ये सामावून)

​नायट्रेट्सशी संपर्क येऊ देऊ नका​

​नायट्रेट्सशी संपर्क येऊ देऊ नका​

जन्मजात हृदयरोग असलेल्या बाळाचे आईवडील आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी देखील जन्मजात हृदयरोग व ब्ल्यू बेबी सिंड्रोम यांच्यातील संबंध समजून घेऊन बाळाचा नायट्रेट्सशी संपर्क येऊ नये यासाठी योग्य ती पावले उचलणे महत्त्वाचे आहे.

(वाचा – जमिनीवर बसून जेवण्याचे आहेत Weight loss सह जबरदस्त फायदे, डायनिंग टेबलजवळ बसणं ठरतंय घातक)

​पिण्याच्या पाण्याचीही गुणवत्ता तपासा​

​पिण्याच्या पाण्याचीही गुणवत्ता तपासा​

पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी बॉटल्ड पाण्याचा वापर करणे, पिण्यासाठी जे पाणी वापरले जाते त्याची गुणवत्ता तपासणे तसेच ज्यामध्ये नायट्रेट्स जास्त आहेत उदाहरणार्थ, पालक, बीट, लेट्युस यासारखे पदार्थ टाळणे असे उपायदेखील केले गेले पाहिजेत.

(वाचा – दुधात भिजवा काजू आणि मिळवा अफलातून फायदे, ऐकाल तर व्हाल हैराण)

हेही वाचा :  चिकन नीट शिजलं नाही, संतापलेल्या पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं... Video व्हायरल

​त्वरीत करावे उपचार​

​त्वरीत करावे उपचार​

आरोग्य देखभाल सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना देखील जन्मजात हृदयरोग आणि ब्ल्यू बेबी सिंड्रोम यांच्यातील संबंध माहिती असणे व जन्मजात हृदयरोग असलेल्या मुलांचा नायट्रेट्सशी संपर्क आला आहे का याची तपासणी त्यांनी करवून घेणे अत्यावश्यक आहे. ब्ल्यू बेबी सिंड्रोम लवकरात लवकर लक्षात आल्यास आणि त्यावर उपचार केले गेल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते तसेच उपचारांमुळे होणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा दिसून येऊ शकते. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे असे म्हणणे आहे की लवकरात लवकर उपचार केले गेल्यास ब्ल्यू बेबी सिंड्रोममुळे मृत्यू ओढवण्याचा धोका ८०% पर्यंत कमी होऊ शकतो.

​जागरूकता महत्त्वाची​

​जागरूकता महत्त्वाची​

जन्मजात हृदयरोग जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या समस्येबाबत आणि जन्मजात हृदयरोगाशी असलेल्या त्याच्या संबंधाविषयी जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. कुटुंब, समाज आणि आरोग्य देखभाल सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना याची पुरेशी माहिती असेल तर जन्मजात हृदयरोग असलेल्या मुलांचा नायट्रेट्सपासून बचाव करण्यात मदत मिळू शकते आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा घडून येऊ शकते.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

हेही वाचा :  International Men's day : Sperm काऊंट कसा वाढवावा? ५ गोष्टी ठरतील जालीम उपाय, खाताच १०० स्पीडने वाढतील शुक्राणू

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …