डायबिटीससह अन्य आजारांवरही गुणकारी आहे आळशी, जाणून घ्या ५ फायदे

आळशी अथवा अळशी असे अनेक ठिकाणी या बियांना म्हटलं जातं. आळशीचा उपयोग लहान मुलांच्या कफ आणि सर्दीसाठी बऱ्याचदा केला जातो हे सर्वांना माहीत आहे. मात्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक आजारांवर आळशीचा फायदा करून घेता येतो. Flax Seeds असे इंग्रजीमध्ये आळशीला म्हटले जाते. आळशीच्या या बियांमध्ये कॉपर, मँगनीज, प्रोटीन, ओमेगा – ३ असिड आणि अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र कोणत्याही पदार्थांचा आपल्या आहारात उपयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. आळशीचे नक्की काय फायदे आहेत आणि कोणत्या आजारांवर ही गुणकारी ठरते जाणून घ्या.

कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना कोलेस्ट्रॉलसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. अगदी लहान वयातही कोलेस्ट्रॉलचा त्रास सुरू झालेला दिसून येतो. तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही नियमित स्वरूपात अळशी खाऊ शकता. अळशीची चटणी करून ती रोज तुमच्या आहारात तुम्ही समाविष्ट करून घ्या. कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी याचा फायदा मिळतो. अळशीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते जे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखण्यास मदत करते. त्यामुळे डॉक्टरही कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांना अळशी खाण्याचा सल्ला देतात. तुम्हाला जर चटणी आवडत नसेल तर तुम्ही जेवणानंतर खाण्यात येणाऱ्या बडिशेपेत अळशी मिक्स करून भाजून खा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो.

हेही वाचा :  तणावामुळे निर्माण होतोय हृदयविकार, वेळीच व्हा सावध अन्यथा गमवाल जीव

कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी सहाय्यक

एका अभ्यासानुसार, अळशीच्या बिया कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. वास्तविक अळशीचे तेल आणि अळशीच्या बियांची पावडर यामध्ये ओमेगा – ३ असिड आणि अल्फा – लिनोलेनिक जास्त प्रमाणात असते. हे कॅन्सरसाठी उत्तम समजण्यात येते. कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात अळशीचा उपयोग करून घेऊ शकता. एखाद्या भाजीत अथवा सलाडमध्ये तुम्ही याचा उपयोग करून घ्या. अथवा अळशी भाजूनही तुम्ही अर्धा चमचा रोज खाऊ शकता. यामुळे कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत मिळेल.

(वाचा – New Year 2023: नव्या वर्षात आहारात करा या ५ विटामिन्सचा समावेश)

पचनक्रिया राहील व्यवस्थित

अळशीमुळे पचन चांगले होते हे सर्वांनाच माहीत आहे. अळशीच्या बियांमध्ये आढळणारे ओमेगा – ३ असिड हे पचनसंबंधित समस्या सोडविण्यासाठी फायदेशीर ठरते. तसंच यामध्ये असणारे फायबर हे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर गुणकारी ठरते. पचनशक्ती वाढविण्यासाठी अळशी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश नक्की करून घ्यायला हवा. तुम्हाला कब्ज, बद्धकोष्ठतेचा त्रास अशा समस्या असतील तर तुम्हाला अळशी खाण्याचा नक्की फायदा मिळू शकतो आणि या समस्यांपासून सुटकाही मिळू शकते.

हेही वाचा :  महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हृदयविकार, जाणून घ्या कारणे आणि उपाय

(वाचा – कोरोनानंतर आता अजून एक हानिकारक रोगाची एंट्री, दक्षिण कोरियात ‘ब्रेन ईटिंग अमीबा’ची पहिली केस)

हृदयरोग्यांसाठी फायदेशीर

अळशीच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिड्ंटस आढळतात, जे हृदयाशी संबंधित आजारांसाठी फायदेशीर ठरते. यामध्ये असणारे उच्च फायबर हे वाईट अर्थात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. तसंच अळशी खाण्याने रक्तातील गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत मिळते. कोलेस्ट्रॉल चांगले राहिले तर हृदयरोगाचा त्रास होत नाही. तुमचे रक्त शुद्ध राहावे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहून हृदयावर त्याचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी तुम्ही अळशी खावी.

(वाचा – Weight Loss करण्यासाठी चपाती योग्य की भाकरी, रिसर्चमध्ये काय आहे)

मधुमेही रूग्णांसाठी गुणकारी

मधुमेही व्यक्तींना रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्याची अत्यंत आवश्यकता भासते. अळशी ही टाईप – २ डायबिटीस रूग्णांकरिता फायदेशीर ठरते. याच्या सेवनामुळेरक्तातील साखरेच्या पातळीत सुधारणा होते. तसंच या छोट्या बियांमधील आढळणारे फायबर, प्रोटीन आणि अल्फा-लिनोलेनिक हे ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत करते. मधुमेही व्यक्तींना सारखेची पातळी संतुलित राखण्याकडे नेहमीच लक्ष द्यावे लागते आणि त्यामुळे अळशीचा आहारात समावेश करून घेणे त्यांना नक्कीच फायदेशीर ठरते. डायबेटिसवर आळशी गुणकारी ठरते.

हेही वाचा :  '32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला...' दिशा सालियन आरोपावरुन आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

अळशी ही अन्य आजारांवर गुणकारी असल्याने त्याचे हे पाच फायदे आम्ही तुम्हाला सांगितले आहेत. हे सर्वाधिक होणारे आजार आहेत आणि यावर अळशी गुणकारीही ठरते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हीही याचा उपयोग करून घ्या.

(फोटो क्रेडिटः Pexels)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …