विमानतळाच्या आसपास बांधकाम परवाने पूर्ववत मिळण्याचा मार्ग मोकळा


पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रयत्न फळास

कराड :  कराड विमानतळापासून  २० किलोमीटरच्या परिघामध्ये बांधकाम परवान्यावर आलेल्या निर्बंधांमुळे हवालदिल झालेले बांधकाम व्यावसायिक व मिळकतदारांना दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेवून नेमकी वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडून यातील संदिग्धता संपवली आहे.

दिल्लीमधील या गाठीभेटी व चर्चांवेळी कराडचे नगरसेवक, बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधीही उपस्थित होते. कराड विमानतळाच्या अनुषंगाने नव्या बांधकामांसाठी परवाने मिळण्याकामी विमानतळ विकास प्राधिकरणाच्या जाचक अटी काढल्या जाव्यात व त्याचा कलर कोडेड झोनिंग नकाशा लवकरच प्रसिद्ध व्हावा यासाठी  पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची व भारतीय विमानतळ प्राधिकरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांची भेट घेतली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, क्रिडाईचे तनय जाधव, कराडचे नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, जावेद शेख, धनराज शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

चर्चेदरम्यान, मंत्री शिंदे यांनी तात्काळ महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दुरध्वनी करून कलर कोडेड नकाशा प्रसिद्ध करण्याच्या व त्यानुसार बांधकामाबाबतच्या अटी शिथिल कराव्यात असे आदेश दिले. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेशाची नवीन नियमावलीसह कलर कोडेड झोनिंग नकाशाची त्वरित अंमलबजावणी केली जाणार आहे. गेल्या चार महिन्यापासून विमानतळ प्राधिकरणाच्या निर्बंधांमुळे कराड, मलकापूर शहरांसह परिसरातील बांधकाम परवाने देणे बंद झाले होते. ते परवाने पूर्ववत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  विमानतळ विकास प्राधिकरणाची ही नियमावली व धोरण सर्वच विमानतळांसाठीही लागू राहणार असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून देण्यात आली आहे.

हेही वाचा :  पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण सेवकांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

The post विमानतळाच्या आसपास बांधकाम परवाने पूर्ववत मिळण्याचा मार्ग मोकळा appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …