रोज या 5 चूका करणारे लोक आयुष्यात कधीच होत नाहीत श्रीमंत व यशस्वी

श्रीमंत होण्याची इच्छा सगळ्यांची असते. पण श्रीमंत होणे सगळ्यांनाच जमते असे नाही. कारण खरंच श्रीमंत होणे हे दिसते तेवढे सोप्पे नक्कीच नाही. तसे असते तर सगळेच जण सहज श्रीमंत झाले असते. आता याचा अर्थ असाही नाही की श्रीमंत होताच येत नाही. हो होता येते पण त्यासाठी मेहनत तर हवी पण काही गोष्टी सुद्धा माहित असायला हव्या.

त्या जर नसतील माहित तर तुम्ही कितीही मेहनत घ्या, तुमचे नशीब कितीही जोरावर असू द्या. तुम्ही श्रीमंत होणार नाहीत. आजवर तुम्हाला अनेकांनी सांगितले असेल की श्रीमंत होण्यासाठी काय करावे पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की श्रीमंत व्हायचे असेल तर या गोष्टी करू नका. कारण याच गोष्टी श्रीमंत होण्यातला तुमचा पहिला अडथळा आहेत.

फक्त जॉब करणे

केवळ जॉब करून तुम्ही श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत असाल तर तुम्हू चुकताय. तुम्ही एका चुकीच्या मार्गावर आहात आणि असे करून तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकणार नाहीत. श्रीमंत होण्यासाठी तुमची बचत आणि गुंतवणूक वाढली पाहिजे. फक्त नोकरी करून त्यातून मिळणाऱ्या पैश्यातून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाहीत हे एक सत्य आहे. त्यामुळे केवळ नोकरीच्या भरवश्यावर राहू नका तर वेगळी कमाई करण्याचे मार्ग शोधा.

हेही वाचा :  Long Distance Relationship मध्ये कसा कराल व्हॅलेंटाईन डे साजरा, या गोष्टी लक्षात ठेवाल तर भांडणं होणार नाहीत

(वाचा :- Virat Kohli ने करोडो मुलींमधून बायको म्हणून का केली अनुष्का शर्माचीच निवड? यामागील कारण अनेकांना आजही माहित नाही)

फक्त बचत करणे

अनेकांना वाटतं की खूप पैसे व्च्वले आणि बचत केली तर पैसे साठवून साठवून तुम्ही कधीतरी करोडपती बनू शकता. पण असेही होत नाही. कारण तुम्ही केलेली बचत कितपत टिकेल हे तुम्ही देखील सांगू शकत नाही. शिवाय तुम्ही किती बचत करता त्यावरून तुमच्याकडे किती पैसे साठतील ते ठरते. आणि आजच्या या महागाईच्या जमान्यात जास्तीत जास्त पैसे साठवणे तर शक्य नाही. कारण खर्च सुद्धा तेवढाच असतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सेव्हिंग तुम्हाला श्रीमंत करेल तर असे होणार नाही.

(वाचा :- माझी कहाणी : वाटलं नव्हतं माझी मैत्रीण धोकेबाज असेल, नव-याचं आयुष्य पार उद्धवस्त करायला निघाली आहे, मी काय करू?)

जुगार खेळणे

बऱ्याच जणांचा समज असतो की जुगारात पैसे लावायचे आणि ते दुप्पट करायचे. हळूहळू मग आपण श्रीमंत होणार. पण शेवटी जुगार हा जुगार सातो. तो तुम्हाला कधी श्रीमंत बनवेल तर कधी पूर्ण भिकारी देखील बनवेल. त्यामुळे असा सहज मिळणारा पैसा तुम्हाला कधीच श्रीमंत करू शकत नाही हे मनावर बिंबवा. तुम्हाला अशा मार्गाची गरज आहे ज्यातून सतत आणि खात्रीशीर पैसा मिळेल. जेणेकरून तुमची सेव्हिंग आणि गुंतवणूक थांबणार नाही. तर वाढतच राहील.

हेही वाचा :  "...तर मग श्रीमंत व्यक्ती पंतप्रधान होतील", उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले "शिंदे गटाचा दावा नीचपणाचा आणि विकृत"

(वाचा :- माझी कहाणी : सर्व छान असतानाही मला लग्नाची प्रचंड भीती वाटतीये, यासाठी माझेच आई वडिलच आहेत जबाबदार, मी काय करू?)

इतरांवर विश्वास ठेवू नका

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की इतरांवर विश्वास ठेवून कधीच गुंतवणूक करू नका. पैसे दुप्पट करून देतो किंवा चांगला परतावा मिळवून देतो असे म्हणून जर कोणी तुम्हाला भूल घालत सेल आणि तुम्ही देखील श्रीमंत होण्यासाठी त्याच्या मागे जात असाल तर तुम्ही चुकताय. इतरांना झलेला फायदा तुम्हाला होईलच असे नाही. शिवाय हे जग असे आहे की कोणावरच विश्वस ठेवू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला मेहनतीचा पैसा वाया घालवायचा नसेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका.

(वाचा :- लग्नाआधी पतीविषयी काहीच माहित नव्हतं, त्याची एक घाण सवय जीवघेणी ठरतीये, जवळ जाण्याची इच्छा होत नाही, मी काय करू?)

मेहनतीला पर्याय नाही

अनेक जण नशिबाच्या भरवश्यावर बसून श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहतात. तुम्ही सुद्धा मी कधीतरी श्रीमंत होईन. माझ्या आयुष्यात तो क्षण येईल अशी वाट बघत बसाल तर तुम्हाला श्रीमंतीची केवळ स्वप्नेच पाहावे लागतील. त्या पेक्षा असल्या भ्रामक समजुतींमधून बाहेर या आणि मेहनत करा. कारण मेहनतीला पर्याय नसतो. मेहनतीचे कमवणे अधिक काळ टिकते अमनी सहज मिळाले वाया जाते, हातात जास्त काळ टिकत नाही असे मोठी लोकं म्हणतात ते उगीच नाही.

हेही वाचा :  Ashok Chavan : 'मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष...', अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले...

(वाचा :- काश…! सासू व सास-यांसमोर ‘ही’ एक गोष्ट करण्याआधी मी काळजी घेतली असती, तर माझ्यासोबत इतकी वाईट घटना घडली नसती..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …