डायबिटीज करतो किडनी, डोळे, लिव्हरसारखे महत्त्वाचे अवयव कायमचे निकामी, लगेच घरीच करा ‘हे’ एक काम

Diabetes हा योगासनांनी कंट्रोलमध्ये येतो असं तुम्हाला सांगितलं तर अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. पण मंडळी, योगामध्ये खूप मोठी शक्ती आहे. योग हा केवळ शारीरिक क्रिया नसून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर खोलवर होत असतो आणि शरीरातील क्रियांवर सुद्धा प्रभाव पडतो. एका संशोधनामधून असे दिसून आले आहे की जेव्हा व्यक्ती अधिकाधिक योग करतो तेव्हा शरीरातील मधुमेह हळूहळू निष्प्रभ होऊ लागतो. योग केल्याने इन्सुलिनचे उत्पादन योग्य प्रकारे होऊ लागते हे खरे आहे.

शिवाय योग करण्याच्या आधी इन्सुलिनचा वापर शरीरातर्फे योग्य व्हायचा नाही तो सुद्धा योग्य प्रकारे होऊ लागतो. याचा परिणाम थेट असा होतो की रक्तातील साखर अर्थात High Blood Sugar कमी होते वा नियंत्रणात राहते. याच्या जोडीला तुमची मधुमेहाची औषधे असतातच, त्यामुळे एकत्रित परिणामाने मधुमेहाला रोखले जाऊ शकते. (फोटो सौजन्य :- iStock, pexels)

कंट्रोल होते हाय ब्लड शुगर

कंट्रोल होते हाय ब्लड शुगर

योगामुळे मधुमेहाच्या उपचारात दोन प्रकारे मदत होते. प्रथम, योगाच्या नियमित सरावाने स्वादुपिंड आणि इन्सुलिनचे कार्य सुधारते आणि दुसरे म्हणजे ते तणाव नियंत्रित करते. Diabetes.co.uk यांच्या मते योग केल्याने हाय ब्लड शुगर नक्कीच नियंत्रणात येते. तर मग मंडळी तुम्हाला सुद्धा मधुमेहाचा आजार असेल आणि त्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू इच्छित असाल तर योगचा आधार नक्की घ्या. घरच्या घरी अगदी मोफत तुम्ही मधुमेहावर योगच्या मदतीने विजय मिळवू शकता. चला जाणून घेऊया कोणती आसने तुम्ही केली पाहिजेत!

हेही वाचा :  मी लुझर आहे... 22 वर्षीय इंजिनिअरने स्वतःला संपवले; आई-बापासाठी चिठ्ठीही लिहली

(वाचा :- Causes of Uric Acid : ‘ही’ 7 फळं पोटात जाऊन बनवतात भयंकर युरिक अ‍ॅसिड, मुतखडा होऊन किडनी होऊ शकते कायमची फेल..)​

पश्चिमोत्तानासन – Paschimottanasana Steps

-paschimottanasana-steps
  1. पश्चिमोत्तानासन करण्यासाठी सर्वात आधी चटईवर पाय पसरून बसा. आता पाठ आणि मान सरळ ठेवा.
  2. यानंतर, श्वास सोडता सोडता हिप्सपासून पुढे वाका.
  3. कोपर सरळ ठेवून हातांनी पायांचे पंजे पकडण्याचा प्रयत्न करा.
  4. तसेच आपले डोके गुडघ्यांवर ठेवण्याचा प्रयत्न करा.
  5. या पोझमध्ये काही वेळ श्वास घ्या आणि नंतर हळू हळू सरळ स्थितीत

या. सुरुवातीला तुम्हाला हे आसन काहीसे जड जाऊ शकते, पण एकदा का शरीराला सवय झाली की तुम्ही अधिक वेळ हे आसन करू शकता.

(वाचा :- Weight Loss: हा पदार्थ लंचमध्ये खा,बसल्या बसल्या पोट-मांड्यांवरची चरबी मेणासारखी वितळेल,जिम-डाएटला कराल गुडबाय)

सर्वांगासन – Sarvangasana Steps

-sarvangasana-steps
  1. सर्वांगासन करण्यासाठी कमरेवर भार देऊन चटईवर झोपा.
  2. आता दोन्ही पाय एकत्र आकाशाच्या दिशेने फोटोत दाखवल्याप्रमाणे वर उचला.
  3. पाय 90 अंशाच्या कोनात आल्यावर पाठीला हाताने आधार देऊन कंबरही वर उचला.
  4. संपूर्ण शरीराचा भार फक्त डोक्यावर आणि खांद्यावरच राहील असा प्रयत्न करा.
  5. या आसनात काही वेळ श्वास घ्या आणि नंतर आराम करा.
हेही वाचा :  कॉन्फिडंसची कमी व बोबडं बोलणं दूर करून 5 मिनिटांत सिंहासारखा करारा आवाज हवा? करा हा उपाय

हे आसन शरीराच्या खालील बाजूस म्हणजे पोटापासून खालील बाजूस असणाऱ्या अवयवांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते.

(वाचा :- Mental Health: या 8 लोकांपासून राहा चार हात दूर,हिसकावतात शांती व सक्सेस लाईफ, या लोकांना ओळखण्याची पद्धत काय?)​

हलासन – Halasana Steps

-halasana-steps
  1. हलासन करण्यासाठी तुम्हाला सर्वांगासनापासूनच पुढे कृती करायची आहे.
  2. जेव्हा तुमचा सर्व भार खांद्यावर आणि डोक्यावर येतो तेव्हा हळूहळू पाय डोक्याच्या मागे आणायला सुरुवात करा.
  3. जेव्हा बोटे जमिनीला स्पर्श करू लागतील तेव्हा तुम्हाला संपूर्ण शरीरावर ताण जाणवू लागेल.
  4. या आसनात काही वेळ श्वास घ्या.

हलासनाला योगाभ्यासात खूप महत्त्व असून यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो असे सांगण्यात येते.

(वाचा :- अंथरूणात पडल्या पडल्या लागेल डाराडूर झोप, आडवं पडूनच करा विज्ञानात सिद्ध झालेला हा उपाय, 8 तासांनीच व्हाल जागे)​

वक्रासन – Vakrasana Steps

-vakrasana-steps
  1. वक्रासन करण्यासाठी सर्वात आधी दंडासनामध्ये बसून पाय समोर पसरवा.
  2. पायाची बोटे आकाशाच्या दिशेने राहू द्या.
  3. आता तळवे हिप्सच्या जवळ ठेवा आणि उजवा गुडघा वाकवा. अशा प्रकारे उजवी टाच डाव्या गुडघ्याजवळ येईल.
  4. यानंतर, दोन्ही खांद्यापासून हात सरळ पसरवा आणि श्वास घ्या.
  5. श्वास सोडा आणि नंतर कंबर उजवीकडे फिरवा. आता तुमचा उजवा हात उजव्या हिप्सच्या मागे घ्या आणि जमिनीवर ठेवा.
  6. डाव्या हाताने उजवा गुडघा धरा.
  7. आपले डोके उजवीकडे वळवून आपल्या उजव्या खांद्याकडे बघा. काही वेळ या आसनात राहा आणि नंतर तीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूने करा.
हेही वाचा :  International Yoga Day का साजरा करायचा? इतिहास, महत्त्व आणि यंदाच्या थीमबद्दल जाणून घ्या

हे आसन तुम्ही केल्यास तुमच्या शरीराला मोठा फायदा मिळतो. तर मंडळी अशी आहेत ही असणे जी तुम्हाला मधुमेहाशी लढण्यासाठी मदत करू शकतात.

(वाचा :- आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ म्हणजे शरीरात बनलं भयंकर अ‍ॅसिड,मुळापासून अ‍ॅसिडिटीचा नाश करतात हे 3 सोपे उपाय)​
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …