SSC CGL Admit Card 2021: SSC CGL अॅडमिट कार्ड जारी

SSC CGL टियर १ अॅडमिट कार्ड 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC ) ने एकत्रित ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन (CGL ) ऑनलाइन साठी SSC CGL अॅडमिट कार्ड 2021 जारी केले आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट – ssc.nic.in आणि इतर प्रादेशिक वेबसाइटवरून SSC CGL टियर १ प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SSC CGL टियर १ प्रवेशपत्र नोंदणी आयडी आणि जन्मतारीख वापरून डाऊनलोड केले जाऊ शकते. एसएससी सीजीएल प्रवेशपत्र २०२१ हे ११ ते २१ एप्रिल २०२२ दरम्यान होणाऱ्या टियर १ परीक्षेसाठी आहे.

उमेदवारांना सूचित केले जाते की SSC CGL टियर १ प्रवेशपत्र अर्जाची स्थिती तपासल्यानंतरच डाउनलोड केले जाऊ शकते. याचा अर्थ उमेदवाराचा अर्ज स्वीकारला गेला नाही तर ते प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकणार नाहीत. उमेदवार खाली दिलेल्या पायऱ्यांचा वापर करून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.

प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे?
१. उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला ssc.nic.in येथे भेट द्यावी लागेल.
२ sscner.org.in सारख्या प्रदेश विशिष्ट वेबसाइटला देखील भेट देता येऊ शकेल.
३. होमपेजवर, ‘संयुक्त ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन 2021 (TIER I)’ साठी ई-प्रवेशपत्र लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
४. तुमचा नोंदणी आयडी, जन्मतारीख किंवा इतर विचारलेली सर्व माहिती भरा.
५. तुमचे SSC CGL टियर १ प्रवेशपत्र २०२१ प्रसिद्ध केले जाईल.
६. परीक्षेच्या दिवशी आणि भविष्यातील संदर्भांसाठी या दस्तऐवजाची प्रत डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवा.

हेही वाचा :  RTE Admission 2022: आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ

कोणतीही साशंकता असेल तर स्पष्टीकरणासाठी अधिकृत वेबसाइट पहा. SSC CGL प्रवेशपत्र (टियर १) हे परीक्षेच्या दिवसासाठी अनिवार्य आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची टियर २ परीक्षेसाठी निवड केली जाईल. प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी लक्षात ठेवावे की प्रवेशपत्रात काही चूक असल्यास, काही चुकीची माहिती देण्यात आली असल्यास, त्यांनी विभागाशी संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी.

IB Recruitment: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सरकारी नोकरी अशी मिळवा… ‘हे’ आहेत पर्याय

JEE Main 2022 Exam: जेईई मेन परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ
CUET 2022: कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …