IIT JAM 2022 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर, ‘येथे’ तपासा

IIT JAM 2022 Answer Key: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी रुरकी (Indian Institute of Technology Roorkee, IIT Roorkee) ने आयआयटी जेएएम (IIT JAM 2022) साठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर ऑनलाइन अंतिम उत्तरतालिका तपासता येणार आहे.

उत्तरतालिका पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करणे आवश्यक आहे. JAM अंतिम उत्तरतालिका तपासल्यानंतर उमेदवार JAM २०२२ मध्ये त्यांच्या संभाव्य गुणांची तुलना करुन ते मोजू शकतात. यापूर्वी तात्पुरती JAM उत्तरतालिका २० फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती.

तात्पुरत्या उत्तरपत्रिकांवर आक्षेप घेण्याची शेवटची तारीख २१ ते २५ फेब्रुवारी होती. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकीने अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. JAM अंतिम उत्तरतालिका तपासल्यानंतर उमेदवार JAM २०२२ मध्ये त्यांच्या संभाव्य गुणांची तुलना आणि गणना करू शकतात. वैध असणार्‍या आक्षेपांच्या आधारे उत्तरतालिका अपडेट केली जाईल. अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे निकाल तयार केला जाईल. JAM २०२२ चा निकाल २२ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.

नोकरीच्या शोधात असाल तर ‘या’ ६ टिप्स नक्की फॉलो करा
JAM 2022 Answer Key: अशी तपासा उत्तरतालिका

हेही वाचा :  Success Story: लहानपणी वडील वारले तर आई विडी कारखान्यात मजूर, यूट्यूबवर शिकून हरिका बनली डॉक्टर

स्टेप १) सर्वप्रथम JAM 2022 ची अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जा.

स्टेप २) JAM अंतिम उत्तरतालिका २०२२’ वर क्लिक करा

स्टेप ३) स्क्रिनवर दिसणारी अंतिम उत्तरतालिका तपासा.

स्टेप ४) उमेदवारांनी घेतलेल्या संबंधित परीक्षेच्या पेपरसाठी उत्तरतालिकेची निवड करणे आवश्यक आहे.

PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड पालिकेत महिलांना नोकरीची संधी
स्टेप ५) JAM अंतिम उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात स्क्रीनवर दिसेल.

स्टेप ६) IIT JAM उत्तरतालिका डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

JAM परीक्षा (JAM २०२२) १३ फेब्रुवारी २०२२ रोजी झाली. सातही पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे होते. यामध्ये एमसीक्यू, एमएसक्यू आणि एनएटी या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले.

नागपूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये भरती, ७५ हजारपर्यंत मिळेल पगार
JAM २०२२ परीक्षेद्वारे पुढील अभ्यासक्रमांना मिळेल प्रवेश
एमएससी (दोन वर्ष), जॉइंट एमएससी-पीएचडी, एमएससी-पीएचडी, ड्युअल डिग्री. आयआयटी टेक्नोलॉजी- भिलाई, भुवनेश्वर, मुंबई, दिल्ली, धनबाद, गांधीनगर, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, जम्मू, जोधपूर, कानपूर, खरगपूर, मद्रास, मंडी, पलक्कड, पटना, रुरकी, रोपर, तिरुपती, वाराणसी. इंटिग्रेटेड पीएच.डी. प्रोग्राम अॅट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर

थेट उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा :  राज्यातील 'या' शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती

IIIT नागपूरमध्ये भरती, डिप्लोमा आणि पदवीधरांना नोकरीची संधी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …