Dharmaveer : ‘धर्मवीर’ ठरला 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा

Dharmaveer : ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. ‘धर्मवीर’ सिनेमा 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 50 दिवसदेखील पूर्ण झाले आहेत. त्यामुळेच सिनेमाच्या टीमने खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 

प्रसाद ओकने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेसोबतचा सिनेमातील एक फोटो शेअर करत लिहिले आहे,” 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार”. 


13 मे रोजी ‘धर्मवीर’ सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. अजूनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. 

आनंद दिघेंच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी उमटवली पसंतीची ठसठशीत मोहोर

हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं पण ‘धर्मवीर’ने बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहे. 

प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.

संबंधित बातम्या

Dharmaveer : ब्लॉकबस्टर ‘धर्मवीर’ आता ओटीटीवर; 17 जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Dharmaveer : ब्लॉकबस्टर ‘धर्मवीर’! दहा दिवसांत केली 18.03 कोटींची कमाई



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Sunday होणार स्पेशल! अशोक मामांची बहुरंगी कारकीर्द दिसणार ‘या’ स्पेशल कार्यक्रमात
Next मुंबईच्या तुफान पावसात बोमन इराणींनी म्हटली मराठी कविता; पाहा Video

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …