Chup On OTT : सनी देओल अन् दुलकर सलमानचा ‘चुप’ ओटीटीवर होणार रिलीज!

Chup On OTT : बॉलिवूड अभिनेता दुलकर सलमान (Dulkar Salman) आणि सनी देओलच्या (Sunny Deol)  ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ (Chup: Revenge of the Artist) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. 

‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ 25 नोव्हेंबरपासून ओटीटीवर!

थरार नाट्य असणाऱ्या ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ या सिनेमात सनी देओल अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. सनी देओल, दुलकर सलमान व्यतिरिक्त या सिनेमात पूजा भट्ट, आणि श्रेया धनवंतरीदेखील मुख्य भूमिकेत आहेत. आता हा सिनेमा येत्या 25 नोव्हेंबरपासून प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 

‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा सिनेमा 190 देशांतील प्रेक्षक हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत पाहू शकतात. आर बल्कीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 


‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ या सिनेमाचे रिलीजआधीच 63,000 तिकीट विकले गेले होते. या बहुचर्चित सिनेमाचा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील भाग आहेत. पण या सिनेमात ते अभिनेता म्हणून दिसत नसून संगीत संयोजकाच्या भूमिकेत आहेत. दुलकरचे अनेक शेड्स या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.

हेही वाचा :  मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

रहस्य उलगडणारा ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’!

बनावट, खोट्या जगावर भाष्ट करणारा ‘चुप’ हा सिनेमा आहे. या सिनेमात अनेक क्लायमॅक्स आहेत. उत्तम सिनेमॅट्रोग्राफीमुळे सिनेमात प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवतो. आर बल्की, राजा सेन आणि ऋषी विरमानी यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. अनेक गोष्टींचं रहस्य उलगडणारा ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा सिनेमा आहे. 

संबंधित बातम्या

Chup Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर दिसली नाही दुलकर सलमान अन् सनी देओलची जादू; पाहा दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …