आलिया नाही तर ‘या’ अभिनेत्रींना दिली होती ‘गंगूबाई काठियावाडी’ची ऑफर

Gangubai Kathaiwadi : आलिया भटचा  (Alia Bhatt) बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. पण गंगूबाई या भूमिकेसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना चित्रपटाची ऑफर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिली होती-

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची ऑफर देण्यात आली. पण प्रियांकानं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण ती त्यावेळी दोन हॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग करत होती.

राणी मुखर्जी  (Rani Mukerji)
संजय लीला भन्साळी यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला देखील गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची ऑफर दिली होती. पण नंतर राणी आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. राणीनं संज लीला भन्साळी यांच्या ब्लॅक या चित्रपटामध्ये काम केले आहे. 

दीपिका पादुकोण (Deepika Padukone)
संजय लीला भन्साळी यांच्या  रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी या चित्रपटांमध्ये दीपिकानं प्रमुख भूमिका साकारली. अनेकदा दीपिकानं संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसला भेट दिली त्यामुळे दीपिका गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात होते. 

हेही वाचा :  हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन; वयाच्या 98 व्या घेतला अखेरचा श्वास

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया भट, शांतनु,अजय देवगण विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …