‘रूप नगर के चीते’ ला जैसलमेर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळाला पुरस्कार

Roop Nagar Ke Cheetey: जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमधून मराठी चित्रपटाने सातत्याने आपली आपली मोहोर उमटवली आहे. अलीकडच्या काही वर्षात मराठी चित्रपट आशय, विषय, मांडणीमध्ये कमालीचा बदलला आहे. दोन मित्रांमधील यारी दोस्तीची कथा सांगणाऱ्या एस एंटरटेन्मेंट बॅनरच्या ‘रूप नगर के चीते’ (Roop Nagar Ke Cheetey) या चित्रपटाला ‘जैसलमेर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ उत्कृष्ट कथानकासाठी ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड’ मिळाला आहे.  या पुरस्काराबरोबरच ‘टागोर आंतरराष्ट्र्रीय चित्रपट महोत्सव’, ‘इंडो फ्रेंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’  आणि  ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ ही आपली छाप सोडली आहे.

‘बेस्ट नरेटिव्ह फीचर फिल्म’ साठी ‘टागोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समीक्षकांचा विशेष पुरस्कार ‘रूप नगर के चीते’ चित्रपटाला मिळाला असून ‘इंडो फ्रेंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ ‘बेस्ट इंडियन फिचर फिल्म’, संगीत  आणि उत्कृष्ट छायाचित्रणासाठी  चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ चित्रपटाची निवड झाली आहे. तसेच ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ ज्युरीने शिफारस केलेल्या ‘आयकॉनिक भारत गौरव पुरस्कार २०२२ (IGBP)’ साठी पुरस्कार विजेते म्हणून ही चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ‘लिफ्ट-ऑफ ग्लोबल नेटवर्क सेशन्स २०२३ मध्ये चित्रपटाची अधिकृतपणे निवड झाली आहे,  हा आघाडीच्या जागतिक ऑनलाइन चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.

हेही वाचा :  'मुघल-ए-आझम' ते 'चलती का नाम गाडी'; मधुबालाचे 'हे' सिनेमे आज घबरल्या नक्की पाहा...

‘रूप नगर के चीते’ या चित्रपटावर होणारा पुरस्कारांचा वर्षाव हा मनाला आनंद देणारा असल्याची भावना दिग्दर्शक विहान सूर्यवंशी आणि निर्माते मनन शाह यांनी व्यक्त केली. महोत्सवात समाविष्ट झालेल्या विविध राज्यांतील अनेक चित्रपटांमधून ‘रूप नगर के चीते’ ला हे पुरस्कार मिळाले असून जगभरातून आलेल्या अनेक चित्रपटांच्या यादीतून ‘रूप नगर के चीते’ ची झालेली निवड नक्कीच कौतुकास्पद आहे.

खरी मैत्री, म्हणजे आनंदाचा ठेवाच, पण या जिगरी दोस्तीत कधीकधी अनबनही होतेच. ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटातून हाच विषय रंजकपणे मांडला आहे.  या  चित्रपटात  करण परब आणि कुणाल शुक्ल,  हेमल इंगळे, मुग्धा चाफेकर आयुषी भावे, सना प्रभु, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, रजित कपूर या कलाकारांच्या  भूमिका आहेत.

news reels New Reels

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Jethalal In Shark Tank India 2 : शार्क टँकमध्ये पोहोचला ‘जेठालाल’; हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …