Breaking News

मनोरंजन

‘इक्बाल’नंतर श्रेयस पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, ‘कौन प्रवीण तांबे’चा ट्रेलर रिलीज

Kaun Pravin Tambe Trailer Out : बॉलिवूडमध्ये सध्या क्रिकेटपटूंवर बायोपिक बनवण्यात येत आहेत. महेंद्रसिंह धोनी, कपिल देवनंतर आता प्रवीण तांबेचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe) असे या सिनेमाचा नाव आहे. क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘कौन प्रवीण तांबे’ सिनेमाचा …

Read More »

हृतिक रोशनच्या घरी लवकरच ऐकू येणार सनईचे सूर! मित्राकडून अभिनेत्याच्या लग्नाचे संकेत!

Hrithik-Saba Wedding : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट झाले होते, तेव्हापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. या नंतरही हातात हात घालून, दोघेही आता अनेकदा स्पॉट झाले आहेत. हृतिकचे कुटुंब सबा आझादसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकने सबासाठी घरी बनवलेले जेवणही पाठवले होते, …

Read More »

Bipasha Basu : बिपाशा बसूकडे आई होणार? नवा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत…

Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover)  हे ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वात चर्चित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांचे लग्न झाल्यापासून त्यांचे चाहते अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत होते, मात्र बिपाशाने नेहमीच या गोष्टीचे खंडन केले आहे. तथापि, तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या कुटुंबासह डिनर आउटिंगला स्पॉट झाली …

Read More »

‘सांभाळ रे बाबा!’, दुसऱ्या अभिनेत्यासोबत कतरिनाचा रोमान्स पाहून चाहत्यांचा विकीला सल्ला!

Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या एका जाहिरातीमुळे प्रचंड चर्चेत आहे. या जाहिरातीत ती अभिनेता धैर्य करवासोबत दिसत आहे. कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कतरिनाची धैर्यसोबत जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून त्यांचे चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने हा व्हिडीओ थेट विकी कौशलला (Vicky Kaushal) टॅग …

Read More »

Punjab Election Result 2022: ‘आप’चा दबदबा, मोगामधून सोनू सूदची बहीण मालविका पिछाडीवर!

Punjab Election Result 2022:  बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद (Malvika Sood)  मोगा मतदारसंघातून (Moga Assembly Seat) सध्या पिछाडीवर आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपर्यंत ती तिसऱ्या क्रमांकावर होती. आम आदमी पक्षाच्या उमेदवार डॉ.अमनदीप कौर पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, अकाली दलाचे बरजिंदर सिंह ब्रार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोगा ही पंजाबमधील (Punjab Election) हायप्रोफाईल जागांपैकी एक असून, चित्रपट अभिनेता सोनू …

Read More »

आधी नातं तुटलं, मग लग्नही मोडलं, आता समंथानं ‘ही’ खास भेटवस्तूही नागा चैतन्यला केली परत!

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) वैयक्तिक आयुष्यात सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. अभिनेता नागा चैतन्यशी (Naga Chaitanya) घटस्फोट घेतल्यानंतर समंथाच्या चाहत्यांना देखील जोरदार धक्का बसला होता. साऊथचं हे प्रेमी जोडपं कधी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेईल अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. मात्र, आता ही जोडी एकमेकांपासून वेगळी झाली असून, दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे सरकले …

Read More »

Dil Dimag Aur Batti : सोनाली कुलकर्णी दिसणार ‘दिल दिमाग और बत्ती’ सिनेमात, पोस्टर रिलीज

Dil Dimag Aur Batti : ‘दिल दिमाग और बत्ती’ (Dil Dimag Aur Batti) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे हटके पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) मुख्य भूमिकेत असणार आहे.  सोनाली कुलकर्णीचा ‘दिल दिमाग और बत्ती’ हा सिनेमा 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 80 – 90 च्या दशकातील इस्टमन कलर …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चा दुसरा ट्रेलर आऊट

The Kashmir Files : बहुचर्चित  ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची दुसरी झलक खूपच दमदार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.  काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. …

Read More »

Historical Upcoming Movies : ‘पावनखिंड’नंतर ‘हे’ ऐतिहासिक सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Historical Upcoming Movies : ‘पावनखिंड’ (Pavankhinda) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. हा सिनेमा अनेक बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत आहे. ऐतिहासिक सिनेमांवर मराठी प्रेक्षकांचे विशेष प्रेम आहे. पावनखिंड सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे ऐतिहासिक सिनेमांवर आणि मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  शिवराज अष्टक ही फिल्म सीरिज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित …

Read More »

Sir Premacha Kay Karaycha : मकरंद देशपांडेंच्या ‘सर प्रेमाचं काय करायचं’ नाटकाचा प्रयोग हाऊसफुल

Sir Premacha Kay Karaycha : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रेक्षक मनोरंजनासाठी सिने-नाट्यगृहात जात आहेत. त्यामुळेच  सिने-नाट्यगृहाबाहेर सध्या हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने 8 मार्च ते 12 मार्च दरम्यान महिला कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कलामहोत्सवात विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर होणार आहेत. कलामहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या मकरंद देशपांडेंच्या (Makrand Deshpande) ‘सर, प्रेमाचं काय …

Read More »

Mission Majnu : ‘मिशन मजनू’ सिनेमाची रिलीज डेट ठरली, Siddharth malhotra अॅक्शन मोडमध्ये

Mission Majnu Release Date : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth malhotra) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) आगामी ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. ‘मिशन मजनू’ हा सिनेमा 10 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  ‘मिशन मजनू’ सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ अॅक्शन …

Read More »

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’चा बॉक्सऑफिसवर धमाका, 100 कोटींची आकडा पार

Gangubai Kathiawadi : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोरोना महामारीनंतर दमदार कमाई करणारा हा चौथाच सिनेमा आहे. या सिनेमाने गेल्या 14 दिवसांत 100 कोटींची कमाई केली आहे. Koo App And #GangubaiKathiawadi hits century today [Wed], the fourth #Hindi film to achieve this number [? cr], post pandemic [#Sooryavanshi, #PushpaHindi, #83TheFilm]… …

Read More »

‘तनु वेड्स मनु 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ कलाकारासोबत कंगना करणार रोमान्स?

Tanu Weds Manu 3 : तनु वेड्स मनु (tanu weds manu 3) या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) आणि अभिनेता आर माधवन (R. Madhavan) यांनी प्रमुख भूमिका साकारली. चित्रपटांच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तनु वेड्स मनु 3’ चित्रपटाचे कथानक कसे असणार आहे? असा …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाच्या प्रदर्शनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 11 मार्चला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. Thank you everyone for your prayers, love and support. Now bless this very small film about the …

Read More »

शाहरुख खानला वाटते ‘या’ गोष्टीची भीती, अनुष्का शर्माकडून डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला   

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान कधी चित्रपटांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. बॉलिवूडचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानला एका गोष्टीची खूप भीती वाटते. या भीतीबद्दल स्वत: शाहरुखने नॅशनल टीव्हीवरील एका कार्यक्रमादरम्यान माहिती दिली होती. शाहरुख खानची ही भीती ऐकल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने त्याला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला.  शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा एक जुना …

Read More »

Radhe Shyam New Song Out : ‘राधे श्याम’ सिनेमातील ‘मैं इश्क में हूं’ गाणे रिलीज

Radhe Shyam New Song Out : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सध्या त्यांच्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 11 मार्च रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमातील ‘मैं इश्क में हूं’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  ‘राधे श्याम’ सिनेमा तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित …

Read More »

Kiran Mane : किरण मानेंनी फेसबुक पोस्ट शेअर करत केले नागराज आणि ‘झुंड’चे कौतुक

Kiran Mane On Jhund : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’  (Jhund) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांसह प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आता अभिनेते किरण मानेंनी ‘झुंड’ सिनेमासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे.  किरण मानेंची फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले आहे,”नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली …

Read More »

Shabaash Mithu : तापसी पन्नूने शेअर केले ‘शाबास मिथू’चे नवे पोस्टर

Shabaash Mithu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) तिच्या आगामी ‘शाबास मिथू’ (Shabaash Mithu) सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘शाबास मिथू’ हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. खास महिला दिनानिमित्त या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.  पोस्टरमध्ये तापसीने हातात हेल्मेट आणि बॅट घेतलेली दिसत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित हा …

Read More »

Baipan Bhari Deva : केदार शिंदेंनी केली ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची घोषणा

Baipan Bhari Deva : महिला दिनी केदार शिंदेंनी (Kedar Shinde) त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात सहा प्रमुख लोकप्रिय महिला कलाकार असणार आहेत. पण त्यांची नावं अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.  केदार शिंदेंनी सोशल मीडियाद्वारे ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर …

Read More »

Ananya: ‘अनन्या’ येतेय; ‘या’ दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

Ananya Movie : बहुचर्चित ‘अनन्या’ (Ananya) सिनेमा अखेर 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने ‘अनन्या’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’, अशी या सिनेमाची सकारात्मक टॅगलाईन आहे. हृता दुर्गुळे (Hruta Durgule) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.  रुईया महाविद्यालयाची ‘अनन्या’ एकांकिका प्रचंड गाजली होती. या एकांकिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत …

Read More »