Punjab Election Result 2022: ‘आप’चा दबदबा, मोगामधून सोनू सूदची बहीण मालविका पिछाडीवर!

Punjab Election Result 2022:  बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद (Malvika Sood)  मोगा मतदारसंघातून (Moga Assembly Seat) सध्या पिछाडीवर आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपर्यंत ती तिसऱ्या क्रमांकावर होती. आम आदमी पक्षाच्या उमेदवार डॉ.अमनदीप कौर पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, अकाली दलाचे बरजिंदर सिंह ब्रार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोगा ही पंजाबमधील (Punjab Election) हायप्रोफाईल जागांपैकी एक असून, चित्रपट अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद निवडणूक रिंगणात उतरली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेली मालविका सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पिछाडीवर आहे.

मालविकाची टक्कर भारतीय जनता पक्षच्या विद्यमान आमदार हरजोत कमल यांच्याशी आहे. तर, आम आदमी पक्षाच्या डॉ.अमनदीप कौर अरोरा आणि शिरोमणी अकाली दलाचे बरजिंदर सिंह ब्रार हेही आव्हान उभे करत आहेत.

मोगा विधानसभेची जागा सुरुवातीपासूनच पंजाबची महत्त्वाची जागा मानली जाते. 5 वर्षांपूर्वी 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती. काँग्रेसच्या हरजोत कमल सिंग यांनी चुरशीच्या लढतीत आम आदमी पार्टीच्या रमेश ग्रोवर यांचा 1764 मतांनी पराभव केला होता. मोगा विधानसभा जागा फरीदकोट जिल्ह्यात येते. या जागेवरून काँग्रेसचे मोहम्मद सादिक खासदार आहेत. त्यांनी शिरोमणी अकाली दलाच्या गुलजार सिंह यांचा 83,356 मतांनी पराभव केला.

हेही वाचा :  Assembly Elections 2022: पंजाबमध्ये सर्व जागांसाठी, तर उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू

मालविकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका हिने 10 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत मालविकाला काँग्रेसचे सदस्यत्व मिळाले. यावर सीएम चरणजीत सिंह चन्नी म्हणाले, ‘एवढ्या चांगल्या कुटुंबातील व्यक्ती आमच्या पक्षात येणे ही भाग्याची गोष्ट आहे.’ तर नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, ‘सोनू सूद त्याच्या माणुसकीसाठी आणि दयाळूपणासाठी जगभरात ओळखला जातो आणि आज त्या कुटुंबातील एक सदस्य आमच्यासोबत आहे. ती एक सुशिक्षित महिला आहे.’

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद ‘मसीहा’ बनून लोकांच्या मदतीला धावून आला. अन्न धान्य असो वा वैद्यकीय मदत, राहण्याचा आसरा असो वा घरी जाण्यासाठीची मदत सोनू सूदने लोकांना शक्य ती सगळी मदत पुरवली. त्याच्या याच इमेजचा मालविका फायदा होईल असे वाटत होते.

या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स 

https://marathi.abplive.com/live-tv 

https://twitter.com/abpmajhatv 

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …