हनुमानाची ही नावं आहेत अगदी आधुनिक, मुलासाठी निवडा ही नावं

बाळाची सुंदर पावलं घरात आल्यानंतर संपूर्ण घराचं वातावरण अगदी आनंदी होऊन जातं. इवलीशी पावलं, लहानसे डोळे, ओठ हे पाहण्यातच दिवस दिवस निघून जातात. बाळाचं नाव ठेवण्यासाठी मग उडते ती तारांबळ. बरेचदा देवाच्या नावावरून बाळाचे नाव ठेवण्यासाठी शोध सुरू असतो.

तुम्हीही हनुमानभक्त असाल आणि घरात मुलाचा जन्म झाला असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. हनुमानाच्या नावावरून अनेक नावं आहेत, पण ती सध्याच्या मॉर्डर्न युगात मॅचही व्हायला हवीत. अशीच आधुनिक नावं ज्याचा अर्थ हनुमानाशी निगडीत असेल त्याची यादी इथे आम्ही देत आहोत. (फोटो सौजन्य – Canva)

हनुमानाशी निगडीत मुलांची नावे

हनुमानाशी निगडीत मुलांची नावे

हिंदू धर्मानुसार हनुमानाला अमरत्व प्राप्त आहे. हनुमानाचे अनेक भक्त आहेत आणि आजही हनुमान आरोग्य, शक्ती आणि यशाचा स्वामी असल्याचे मानले जाते. हनुमान आपल्या भक्तांचे दुर्भाग्य दूर करून आजारांचे निवारण करतात असा समज आहे. त्यामुळे बाळाचे नाव हनुमानाच्या अर्थावरून ठेवण्याचा काही जणांना मानस असतो. यासाठी हनुमानाच्या भक्तांना त्यांच्या नावाशी संबंधित नावाचा शोध असतो. त्यासाठी काही खास नावं अर्थासह जाणून घ्या.

हेही वाचा :  कोकेन आणि दारूच्या व्यसनाने उद्ध्वस्त केले या प्रसिद्ध मॉडेलचे करिअर

मकरध्वज

मकरध्वज

मकरध्वज हे खरं तर भगवान हनुमानाचा पुत्र असल्याचे मानले जाते. ग्रंथामध्ये उल्लेख असल्याप्रमाणे हनुमानाच्या घामापासून मकरध्वजाचा जन्म झाला होता. रामायणामध्ये या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचेही सांगण्यात येते. हे नाव हनुमानाशी जोडलेले असून वेगळे असल्यामुळे तुम्ही आपल्या मुलाच्या नावासाठी विचार करू शकता.

(वाचा – आदित्य नारायणच्या गोड मुलीचे नाव ‘त्विशा’, त वरून मुलींची नावे अर्थासहित घ्या जाणून )

रुद्रांश

रुद्रांश

हनुमानाला भगवान शिवाचा रूद्र अवतार मानण्यात येते. धर्मग्रंथात सांगण्यात आल्याप्रमाणे हनुमान हे भगवान शिवाचे एक रूप आहेत. त्यामुळे भगवान शंकराचा एक अंश म्हणून रौद्र रूप धारण केलेला एक अंश अर्थात रुद्रांश असे नावही हनुमानाचे आहे. हेच नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता.

(वाचा – लग्नाच्या १८ वर्षानंतर अपूर्व-शिल्पाला झाली मुलगी ठेवले पारंपरिक आणि युनिक अर्थाचे नाव, मुलींच्या नावासाठी घ्या प्रेरणा)

चिरंजीवी

चिरंजीवी

हनुमानाचे एक नाव चिरंजीवीदेखील आहे. कायम अमर राहणारा अर्थात चिरंजीवी. हनुमान हे त्या देवतांपैकी एक आहेत ज्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे. अजरामर असणारा अर्थात चिरंजीवी. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव चिरंजीवी ठेऊ शकता. साऊथ सुपरस्टारचेदेखील नाव आहे.

हेही वाचा :  'हनुमान चालीसा'वरून निवडा मुला-मुलींकरिता युनिक नावे

महावीर

महावीर

हनुमानाच्या नावांपैकी एक नाव महावीर असेही आहे. हनुमान चालिसामध्ये महावीर या नावाचा समावेश आहे. सर्व वीरांचा वीर अर्थात महावीर. धैर्यवान असणारा महावीर असे तुम्ही तुमच्या बाळासाठी नाव निवडू शकता.

रूद्राय

रूद्राय

रूद्राय अर्थात भगवान शंकरापासून उत्पन्न झालेला. हनुमान हा शंकराचा अवतार मानला जातो हे सर्वांनाचा माहीत आहे. पुराण कथांमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे शंकरापासून हनुमानाचा जन्म झाला आहे. त्यामुळे त्याला रूद्राय हे नाव देण्यात आले आहे. तुमच्या मुलासाठी तुम्ही हनुमानाचे हे युनिक नाव निवडू शकता.

(वाचा – ठेवा बाळांची नावे थोर संतांवरून, मूळ नावाचा जपा वारसा )

शौर्य

शौर्य

शौर्य नाव भगवान हनुमानाशी जोडलेले आहे. शौर्य अर्थात निर्भय, पराक्रमी आणि बहादूर असा. हनुमानाचे सर्व गुण या नावात एकवटलेले आहेत. तसंच आधुनिक नावांमध्ये शौर्य हे नाव परफेक्ट फिट होते. हनुमानाचे हे नाव आपल्या मुलासाठी तुम्ही निवडा.

तेजस

तेजस

हे नाव जरा कॉमन असले तरीही हनुमानाशी संबंधित आहे. तेजस अर्थात असा व्यक्ती ज्यामध्ये तेजस्वीपणा ठासून भरला आहे. तेजस हे आधुनिक नाव असून त्याचा अर्थ हनुमानाशी संबंधित आहे. हनुमानाचा तेजस्वीपणा या नावात भरला आहे.
तुम्हीही हनुमानभक्त असाल तर या नावांपैकी तुम्ही कोणत्याही नावाची निवड आपल्या बाळासाठी करू शकता.

हेही वाचा :  प्रभू रामचंद्राच्या पवित्र नावावरून ठेवा मुलांची युनिक नावे

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …