Mobile खरेदी करण्यासाठी कधी आहे शुभ मुहूर्त? गणेश चतुर्थीपासून ‘या’ दिवशी घ्या तुमचा आवडता मोबाईल

Mobile Phone Buy 2023 : लवकरच गणपती आगमनासोबत आता सणासुद्दीला सुरुवात होणार आहे. सणासुद्दीतील शुभ मुहूर्तावर अनेक जण घरातील वस्तूसह सोन्याच्या दागिनींची खरेदी करतात. एसी, फ्रीज, टीव्हीसह मोबाईल फोन सर्वसामान्य खरेदी करतात. अशातच Apple ने नवीन Apple Watch 9 मालिका त्यांच्या नवीन iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max सोबत लॉन्च केला आहे. सणाची रेलचेल पाहाता आता मोबाईल कंपन्यांही त्याचे नवीन मॉडेल मोबाईरल प्रेमींसाठी घेऊन येणार आहेत. (Mobile Phone Buy 2023 shubh muhurat 2023 ganesh chaturthi 2023 and october november month)

हिंदू धर्मात शुभ कामं असो किंवा नवीन वस्तूची खरेदी असतो, शुभ मुहूर्त पाहून करतात. यासाठी पंचांग त्यांना मदत करतो. शुभ मुहूर्तावर केले कामं असो किंवा खरेदी ही शुभ परिणाम देते अशी मान्यता आहे. अशात जर तुम्हीदेखील मोबाईल खरेदीचा विचार करत असाल. मग तो बाजारात जाऊन असो किंवा ऑनलाइन शुभ मुहूर्त पाहून घ्या. आज मोबाईल हा फक्त संवाद साधण्यासाठी नाही तर दैनंदिन आवश्यक कामांसाठी वापरला जातो. एवढंच नाही तर अनेकांचं नोकरीचं काम त्यावरून केलं जातं. अशात मोबाईल घेताना संपूर्ण माहिती जाणून योग्य तो मोबाईल घेणं महत्त्वाचं आहे. 

हेही वाचा :  Online Shopping करताना 'या' गोष्टींची काळजी घेतली नाही तर, फसवणूक होणारच

‘या’ दिवशी करा मोबाईलची खरेदी!

19 सप्टेंबरला घरोघरी आणि मंडपात लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यानंतर एकामागोमाग सणांना सुरुवात होईल. शिवाय सप्टेंबर महिला अर्धा उलटला असून या वर्षातील तीन महिने बाकी आहेत. अशात या साडेतीन मोबाईल खरेदीसाठी कुठले शुभ मुहूर्त आहे जाणून घ्या.

सप्टेंबर 2023 

गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरसोबत 27 तारखेलाही शुभ मुहूर्त खरेदीसाठी आहे. 

ऑक्टोबर 2023 

3 ऑक्टोबर 2023 – मंगळवार 
4 ऑक्टोबर 2023 – बुधवार
5 ऑक्टोबर 2023 – गुरुवार 
6 ऑक्टोबर 2023 – शुक्रवार
7 ऑक्टोबर 2023 – शनिवार
8 ऑक्टोबर 2023 – रविवार 
24 ऑक्टोबर 2023 – मंगळवार 

नोव्हेंबर 2023 

नोव्हेंबर महिन्यात फोन खरेदीसाठी शुभ मुहूर्त – 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 24 नोव्हेंबर हे आहेत. 

ज्योतिषशास्त्रानुसार मोबाईल खरेदीसाठी गुरुवार, शनिवार आणि रविवार हा उत्तम दिवस असतो. त्याशिवाय या कुठल्या सणाला तुम्ही मोबाईल खरेदी करु शकता जाणून घ्या. 

गणेश चतुर्थी
नवरात्री
धनत्रयोदशी
अक्षय्य तृतीया
दसरा
करवा चौथ
दिवाळी
मकर संक्रांत
भाऊबीज
कार्तिक पौर्णिमा

हेही वाचा :  नव्या आठवड्याची सुरुवातही पावसानेच; राज्यातील 'या' भागांमध्ये कोसळधार

स्मार्टफोनही एक लक्झरी वस्तू असून ज्योतिषशास्त्रात शुक्राला चैनीच्या वस्तूंचा कारक मानला जातो. पण या चैनीच्या वस्तूशी शुक्रासोबतच मंगळ, बुध आणि राहूचाही संबंध आहे. सगळ्यात महत्त्वाच शनिदेव आणि चंद्राचाही तेवढ्याच प्रभाव पडतो. 

मोबाइलचा वापर स्थानिक, रोमिंग आणि जागतिक स्तरावर होतो, अशावेळी त्यावर ग्रहांचा परिणाम दिसून येतो. राहूचा संपर्क हा तृतीय घरात असतो अशावेळी कुंडलीत पाप ग्रहांमुळे अशुभ योग तयार झाला आहे. अशाच वेळी  कधी कधी मोबाईल फोनद्वारे फेक कॉल्स किंवा फोनद्वारे सायबर गुन्ह्यांसारखे कृत्य घडतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …