लाइफ स्टाइल

23 वर्षांपूर्वीचा दहशतवादी कारवायांमधील आरोपी जळगावात करत होता शिक्षकाची नोकरी; असा अडकला जाळ्यात

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगावच्या भुसावळ शहरातील मिल्लतनगर भागात राहणाऱ्या एकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 23 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने भुसावळमध्ये धडक देत सापळा रचून मिल्लत नगरमधील राहत्या घरातून …

Read More »

शिक्षकांना सर्वात मोठा दिलासा! राज ठाकरेंच्या प्रयत्नांना यश; अमित ठाकरेंनी शेअर केली ‘ती’ नोटीस

Big Relief To Teachers And Students In Mumbai: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंच्या प्रयत्नांमुळे राज्यातील शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना निवडणूक काळात मोठा दिलासा मिळणार आहे. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरेंनीच यासंदर्भात एका पोस्टमधून माहिती दिली आहे. राज ठाकरेंनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एक पत्रक जारी करत महत्त्वाचा आदेश दिला आहे. काय म्हणाले अमित …

Read More »

‘बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून..’; मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

Manohar Joshi Death MNS Chief Raj Thackeray Paid Tribute: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता मनोहर जोशींचं निधन झालं. मनोहर जोशींच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे …

Read More »

‘सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या…’, मनोहर जोशींच्या निधनाने गडकरी भावूक; हळहळून म्हणाले, ‘कुटुंब…’

Manohar Joshi Death Political Leaders Paid Tribute: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता मनोहर जोशींचं निधन झालं. मनोहर जोशींच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही सोशल मीडीयावरुन आपल्या …

Read More »

पवार-ठाकरे मैत्रीमुळे मनोहर जोशी झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; ‘त्या’ सल्ल्यानं नशीब पालटलं

First Non Congress Chief Minister Of Maharashtra Manohar Joshi Death: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे 3 वाजता निधन झालं आहे. 86 वर्षीय मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय तसेच महाराष्ट्राचे पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री अशी मनोहर जोशींची ओळख …

Read More »

Weather Update: राज्यात ‘या’ भागांत पुढील काही दिवस पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra weather update: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये वातावरणात बदल पहायला मिळतोय. काही भागांमधून थंडी अचानक गायब झाली असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. कमाल तापमानाचा पारा वाढत असतानाच दुसरीकडे विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात 24 तारखेनंतर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून गडगडाटीसह किरकोळ पावसाची …

Read More »

Neeraj Grover Murder Case: एक अभिनेत्री, तिचा बॉयफ्रेंड अन् नीरज… त्या शेवटच्या रात्री नेमकं काय घडलं?

Neeraj Grover Murder Case: प्रेमाच्या नादात जीव गमावल्याची अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, कित्येक वर्षांपूर्वी मुंबईत घडलेल्या एका घटनेने अंगाचा थरकाप उडेल. मुंबईलगतच्या पॉश सोसायटीत मध्यरात्री जे घडत होतं त्यामुळं फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरला. एका घरात मध्यरात्री निर्घृण हत्या झाली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे 300 तुकडे करण्यात आले. नंतर, जे काही घडलं ते भीती …

Read More »

वटवृक्षासाठी आग्रही असेलल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळाले ‘हे’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

NCP-Sharadchandra Pawar Party Symbol : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अखेर चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्हाचे वाटप केले आहे. चिन्हाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शरद पवार प्रचाराची ‘तुतारी’ फुंकणार आहेत.  राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. त्यानंतर शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव …

Read More »

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर

Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या मनोहर जोशी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी डॉक्टरांच्या निगरानीखाली असून, त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळत असल्याचं प्रसिद्धीपत्रक हिंदूजाने जारी केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री …

Read More »

आताची मोठी बातमी! पुणे ड्रग्स रॅकेटच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, अशी केली सुरुवात

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात आताची सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. ड्रग्स रॅकेटमधील मास्टरमाईंडचं (Pune Drugs Rackets) नाव समोर आलं आहे. ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंडचं नाव संदीप उर्फ सनी धूनिया (Sandeep Dhunia) असं आहे. धूनिया हा मूळचा पाटणाचा असून त्याचं कुटुंब लंडनमध्ये वास्तव्यास आहे.  2016 मधील कुरकुंभ इथं मारलेल्या छाप्यात सनी याला पकडण्यात आलं होतं. …

Read More »

एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल; पंकजा मुंडे यांच्या मानात नेमकं काय?

Pankaja Munde : बीड लोकसभा मतदारसंघावरुन पंकजा मुंडेंनी मोठं विधान केले आहे. बीड लोकसभेचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी घेतील असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले आहे. बीडची लोकसभेची जागा प्रीतम मुंडेच लढतील अशी भूमिका पंकजा मुंडेंनी याआधी घेतली होती. मात्र,  आता पंकजांनी वरिष्ठांवर हा निर्णय सोपवला आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आष्टीमध्ये बूथप्रमुखांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बोलत …

Read More »

संजय राऊत आणि संजय निरूपम यांच्यातील जुना वाद महाविकास आघाडीला भोवणार; माघार घ्यायला कुणीच तयार नाही?

Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. अशातच आता महाविकास आघाडीत वेगळाच पेच निर्मिाण झालेला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांच्यातील जुना वाद महाविकास आघाडीला भोवण्याची शक्यता आहे. दोघांपैकी …

Read More »

हत्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न तरुणीला पडला महागात, सोंडेने खाली पाडलं अन् नंतर…; पाहा VIDEO

माणसाला त्याचा आवडते प्राणी विचारलं तर त्यात हत्तीचा उल्लेख नक्की केला जातो. याचं कारण हत्ती हा माणसाचा मित्र म्हणूनच पाहिला गेला आहे. जर हत्तीला प्रेमाने वागवलं तर तो माणसावर नितांत प्रेम करतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. पण जर त्याला त्रास दिला तर त्याच्याइतका वाईट प्राणी नाही हेदेखील तितकंच खरं आहे. सोशल मीडियावर हत्तीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. …

Read More »

रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या चहा, वडापाव संदर्भात रेल्वेचा मोठा निर्णय, आता यापुढे…

Railway Platforms News in Marathi: भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. अनेक परप्रांतीय लोक दररोज रेल्वेने स्थानकात ये-जा करतात आणि ट्रेन पकडतात. भारतीय रेल्वेची देशभरात हजारो स्थानके आहेत. रेल्वे स्थानकांवर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. जेणेकरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येथे खाद्यपदार्थ मिळू शकतील. मात्र आता याच खाद्यपदार्थसंदर्भात मोठी अपडेट समोर आली असून रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉलवरुन आता गरमागरम …

Read More »

मनोज जरांगेंच्या लढ्याला गालबोट, आरोप करणाऱ्यांना सरकारचं पाठबळ?

Maratha Reservation : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळला गेला. मात्र आता त्याच मराठा आंदोलनात (Maratha Aandolan) आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झालीय. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषणाचं हत्यार उपसणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनीच गंभीर आरोप केलेत. जरांगे पाटील हा शरद पवारांचा (Sharad Pawar) माणूस असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंनी …

Read More »

कडक सॅल्यूट ठोकला अन अडकला, 12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी अटकेत..

जयेश जागड, झी मीडिया, अकोला : बुधवारपासून महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. मात्र असे असले तरी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी विविध शक्कल लवढवण्यात येत असल्याचे समोर येत आहे. अशातच अकोल्यामध्ये कॉपीसाठीचा धक्कादायक प्रकार समोर …

Read More »

शब्दांवाचून कळले सारे… 20 वर्षानंतर अचानक जोडीदार समोर येऊन बसला अन्…; सेलिब्रिटीचा हा Video पाहाच

Viral Video : ‘प्रेम…’ कितीही नाही म्हटलं तरीही हे प्रेम आपल्या जीवनात वेगवेगळ्या रुपांमध्ये येतं आणि आयुष्य समृद्ध करून जातं. हे प्रेम, प्रेमाची भावना प्रत्येक व्यक्तीसाठी तितकीच हवीहवीशी असते. या प्रेमाच्या प्रवासात अनेक चढ- उतार येतात. त्यातून काही नाती तरून पुढं जातात तर, काही नाती मात्र काळाच्या ओघात दुरावतात आणि मग हक्काची माणसं परकी होतात.  जागतिक स्तरावरील एका परफॉर्मन्स आर्टिस्ट …

Read More »

‘जरांगे हा शरद पवार यांचा माणूस’ बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप

Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची अधिसूचना लागू करा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यार त्यांचे जुने सहकारी आणि किर्तनकार अजय बारसकर (Ajay Baraskar) यांनी गंभीर आरोप केले होते. जरांगे पाटील हेकेखोर असल्याचं सांगत त्यांनी संत तुकारामांचा अपमान केल्याचा बारसकर यांनी केलाय. तसंच मुंबई मोर्चावेळी शेवटच्या दोन गुप्त बैठकांमध्ये काय झालं हे मनोज जरांगेंनी स्पष्ट करावं, जरांगेंची …

Read More »

लग्नाचे मुहूर्त बदलण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन; सर्व धर्मियांना केली विनंती

Maratha Reservation : महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारने लवकरात लवकर सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे अन्यथा मोठं आंदोलन करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. यासोबत येत्या 24 फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. …

Read More »

Pune Drugs Case : पुण्यातून 4000 कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, सांगलीपासून थेट इंग्लंडपर्यंत कनेक्शन

Pune Drugs Case : गेल्या तीन दिवसांपासून पुणे पोलिसांनी आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचा मेफेड्रोन म्हणजेच एमडी जप्त केला आहे. पुणे, कुरकुंभ आणि दिल्लीपाठोपाठ सांगली जिल्ह्यातूनही अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे, दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसीमध्ये 300 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान पुणे पोलिसांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर छापा टाकून …

Read More »