ताज्या

Pune Crime | सेक्स रॅकेट उघड, दलालांना अटक, अभिनेत्रीची सुटका

पुणे : पुणे शहराची गेल्या काही दिवसांपासून क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झाली आहे. शहरात आणि लगतच्या भागांमध्ये दररोज काही न काही घडतचं असतं. आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसह एकूण 3 जणांची वेश्या व्यवसातून सुटका केली आहे. या अभिनेत्रीकडून लॉजवर हा वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सना अटक …

Read More »

पैसे संपले, खायला अन्न नाही, विमान पकडण्यासाठी १० किमीची पायपीट, डोंबिवलीतील विद्यार्थी अडकला युक्रेनमध्ये

डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. मात्र, तेथे पोहोचताच युक्रेन शहरावर बॉम्ब हल्ले सुरू झाले. भगवान मंडलिक, लोकसत्ता डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. मात्र, तेथे पोहोचताच रशियाने युक्रेन शहरावर बॉम्ब हल्ले सुरू केले आणि विद्यापीठात पाऊल न ठेवताच संकेतवर भारतात परतण्याची वेळ आली आहे. युक्रेनमधील भुको विनियान …

Read More »

IND vs SL : धक्कादायक बातमी..! श्रीलंका संघाची ने-आण करणाऱ्या बसमध्ये आढळले…

याप्रकरणी संबंधित बसचालकाची चौकशी करण्यात येत आहे. श्रीलंकेचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० मालिका खेळवली जात आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना पंजाबमधील मोहाली येथे होणार आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेचा कसोटी संघ मोहालीत आहे. श्रीलंकेचा संघ मोहाली स्टेडियमवर दररोज सराव करत आहे. दरम्यान, एक …

Read More »

विश्लेषण : स्विफ्ट नेटवर्क म्हणजे काय? रशियन बँकांच्या त्यातून हकालपट्टीचा अर्थ काय?

आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतूनच रशियाची हकालपट्टी करू पाहणारे हे पाऊल अण्वस्त्राप्रमाणे त्या देशासाठी संहारक ठरेल, असे बोलले जात आहे. कसे ते पाहू या. सचिन रोहेकर अमेरिका, ब्रिटनसह, युरोपीय महासंघ आणि सहयोगी देशांनी जागतिक स्तरावर हजारो वित्तीय संस्थांद्वारे वापरल्या जाणार्‍या ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय देयक प्रणालीमधून रशियातील बँकांना वगळण्याला मान्यता दिली आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियावर लादल्या गेलेल्या आर्थिक निर्बंधांना कठोरतम टोक देणारे …

Read More »

वजन कमी करण्यासाठी रोज ग्रीन टी पिताय तर घ्या योग्य काळजी; होऊ शकतात ‘हे’ आजार

तुम्ही देखील सतत ग्रीन-टीचे सेवन करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने अनेक आजार तुम्हाला घेरतात. साधारणपणे, बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की ग्रीन-टीचे सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते, जर तुम्ही देखील सतत ग्रीन-टीचे सेवन करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने अनेक आजार तुम्हाला घेरतात. यामध्ये डोकेदुखी, आळस, …

Read More »

IND vs SL : मैदानात उतरताच हिटमॅन बनला टी-२० क्रिकेटचा नवा बादशाह! पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितनं मोठा विक्रम आपल्या नावावर केला. भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार रोहित शर्माने आज रविवारी (२७ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इतिहास रचला आहे. धर्मशाला येथील रोहितचा हा १२५वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आहे. तो जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिकचा विक्रम मोडला. मलिकच्या …

Read More »

उपोषण मागे नाहीच, गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही संभाजीराजे निर्णयावर ठाम

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. सरकारच्या बैठकीत काय झालं ते त्यांनी सांगितलं. माझे उपोषण हे स्वतःसाठी नाही तर गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून हा प्रयत्न आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकारकडून लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आमरण उपोषणास बसलेले संभाजीराजे यांनी घेतलीय.  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आझाद …

Read More »

‘आमच्या घरी १२ महिने…’, लेकीचा हटके व्हिडीओ पोस्ट करत सोनाली कुलकर्णीने दिल्या ‘मराठी भाषा दिना’च्या शुभेच्छा

सोनालीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आज २७ फेब्रवारी हा दिवस जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीतील थोर लेखक-कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो. महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाचा, आत्मियतेचा, मराठमोळ्या संस्कृतीचा आणि साहित्याच्या गुणगौरवाचा दिवस म्हणूनही याकडे …

Read More »

“तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत

युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांना टॅग करत असं काही आवाहन केलं, की मस्क यांनी पुढील १० तासात युक्रेनमध्ये २,००० उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारी स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा सुरू केली. रशियाने शक्तिशाली सैन्याच्या जोरावर युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेनची यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. युक्रेनला जगापासून तोडण्यासाठी रशियाने युक्रेनच्या ब्रॉडबँड सेवेची यंत्रणाही बेचिराख करण्यास सुरुवात …

Read More »

“काँग्रेसमध्ये काही लोक फक्त एसीमध्ये बसून मोठमोठी भाषणं ठोकतात”, राहुल गांधींनीच घेतली नेतेमंडळींची शाळा!

राहुल गांधी म्हणतात, “काँग्रेसमध्ये काही लोक कामात खोडा घालणारे देखील आहेत. ते भाजपामध्ये जाऊ शकतात”! गेल्या ७ वर्षांपासून काँग्रेस केंद्रात सत्तेपासून दूर आहे. या मधल्या काळामध्ये काँग्रेससमोर अनेक मोठमोठी आव्हानं उभी राहिली आहेत. अनेक नेतेमंडळी पक्षाला रामराम ठोकून भाजपा किंवा इतर पक्षांच्या मार्गाला लागली आहेत. मात्र, तरीदेखील अजूनही काही राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाला सक्षम नेतृत्व आणि …

Read More »

ब्रेकअपनंतर ‘या’ राशींचे लोक अक्षरशः होतात ‘कबीर सिंग’; प्रेमभंग पचवणं जातं प्रचंड अवघड

प्रेमभंग होणं ही खूपच वेदनादायी गोष्ट आहे. प्रेमभंग म्हणजे ब्रेकअपमुळे बऱ्याच जणांच्य मानसिकतेवर गंभीर परिणामही होतात. मात्र काही जणांना प्रेमभंग पचवणं सोपं जातं तर काही जणांना वर्षानुवर्षे हे दुःख पचवता येत नाही. परिणामी, व्यसनं, मानसिक आजार, अनारोग्य अशा अनेक गोष्टींचा सामनाही त्यांना करावा लागतो. याचं एक उदाहरण कबीर सिंग चित्रपटात पाहायला मिळालं. ज्योतिष शास्त्राच्या बारा राशींच्या माध्यमातून आपल्या स्वभावाविषयी आपल्याला …

Read More »

“राज्यातील करोनाची तिसरी लाट आटोक्यात, पण मास्कमुक्ती…;” आरोग्यमंत्री राजेश टोपे

सध्या राज्यात ९ हजार सक्रिय करोना रुग्ण असून आहेत. तिसऱ्या लाटेतील करोना बाधितांची दररोजची संख्या ही ४८ हजारापर्यंत गेली होती. परंतु आता राज्यातील करोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून हा चिंतेचा विषय नक्कीच नाही. त्यामुळे ही तिसरी लाट संपली, असं माझं वैयक्तिक मत आहे. असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे परीणाम भोगले, …

Read More »

“मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणतात, हल्ली शिव्यांपुरतेच ‘ते’ मराठीपण जपतात” ; आशिष शेलारांनी साधला निशाणा!

“हे तर शिवसेनेचे टूलकिट…!”, असं देखील शेलार यांनी बोलून दाखवलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात विविध मुद्य्यांवरून शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यातील वाद वाढलेला दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तर, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर चढवलेल्या शाब्दिक …

Read More »

IPL 2022 : ‘या’ दोन संघांत खेळवली जाणार ओपनिंग मॅच; वानखेडेवर रंगणार झुंज!

आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) २६ मार्चपासून सुरू होत आहे. सलामीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. न्यूज १८ हिंदीच्या वृत्तानुसार, १० संघांच्या या स्पर्धेचा सलामीचा सामना मागील हंगामातील दोन अंतिम फेरीतील संघांमध्ये खेळवला जाईल. म्हणजेच गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या मोसमातील उपविजेता कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) पहिल्या सामन्यात आमनेसामने …

Read More »

रोहित ब्रिगेडचा मराठी बाणा..! मुंबई इंडियन्सनं ‘खास’ शैलीत दिल्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जातो. या खास दिवशी आयपीएलमधील बलाढ्य संघ मुंबई इंडियन्सने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आयपीएलची सर्वाधिक पाच विजेतेपदे जिकली आहेत. मुंबई इंडियन्सने ट्विटरवर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी मराठीतून ट्वीट केले आहे. आपली …

Read More »

Russia Ukraine War: “…म्हणून मी युक्रेन सोडून मायदेशी परतणार नाही,” भारतीय मुलीचा निर्धार

नेहाने गेल्या वर्षी युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौथा दिवस आहे. रशियन सैन्य राजधानी किव्हकडे आगेकुच करत असून क्षेपणास्त्र हल्ला सुरुच आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष  वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी चर्चेसाठी तयार आहे, परंतु बेलारूसमध्ये नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे युद्ध सुरूच राहणार आहे. युक्रेनमध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांना रशियाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. …

Read More »

लोकसत्ता विश्लेषण : कब्जेहक्काने दिलेल्या जमिनींवरील इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागणार? काय सांगतो शासन आदेश?

उमाकांत देशपांडे शासनाने कब्जेहक्काने दिलेल्या जमिनींवरील इमारतींमधील सदनिका विक्रीचे अनधिकृत व्यवहार दंड आणि हस्तांतरण शुल्क आकारून नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या जीर्ण झालेल्या खासगी इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागण्याची शक्यता आहे. या निर्णयाच्या होणाऱ्या परिणामांविषयी… मुंबईसह राज्यात शासनाने कब्जेहक्काने कधी जमिनी दिल्या आहेत? त्यावर किती सहकारी गृहरचना संस्था आहेत? राज्य शासनाने १९६०-७० च्या दशकात आणि त्यानंतरच्या काळात …

Read More »

नोकरदारांनो सावधान! कार्यालये, आस्थापनांच्या नाम पट्ट्या वाहनाच्या दर्शनी भागात लावल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई

सरकारी-खाजगी कार्यालयांमध्ये काम करणारे बहुतांशी नोकरदार आपल्या खासगी वाहनांमध्ये दर्शनी भागात आपण काम करत असलेल्या आस्थापना, कार्यालयांच्या नावाच्या नामा पट्ट्या लावतात. अशा सर्व वाहन चालक आणि नोकरदार यांच्यावर डोंबिवली, कल्याण वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली आहे. मागील दोन दिवसांत डोंबिवली, कल्याणमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १७० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवली, कल्याण, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ डॉक्टर वास आंबेडकर परिसरातील बहुतांशी …

Read More »

“माफ करा मला…”, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट

नुकतंच मेहुलने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. अभिज्ञा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिज्ञा भावे ही गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच मेहुल पै सोबत लग्नबंधनात अडकली. पण सध्या मेहुल हा कर्करोगाशी झुंज देत आहे. नुकतंच मेहुलने याबाबतची …

Read More »

‘झुकेंगे नहीं, लढेंगे और जीतेंगे भी’; जयंत पाटलांचा निर्धार म्हणाले, “राज्यातलं सरकार यांच्या…”

जयंत पाटील यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. ‘दिल्ली समोर कधी झुकायच नाही’, ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली आहे. “झुकेंगे नहीं लढेंगे…और जीतेंगे भी” असे म्हणत राज्यमंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे. ते तळेगाव येथे जाहीर सभेमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करताना दिसत आहे. त्यावरून जयंत पाटील …

Read More »