“मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणतात, हल्ली शिव्यांपुरतेच ‘ते’ मराठीपण जपतात” ; आशिष शेलारांनी साधला निशाणा!


“हे तर शिवसेनेचे टूलकिट…!”, असं देखील शेलार यांनी बोलून दाखवलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात विविध मुद्य्यांवरून शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यातील वाद वाढलेला दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तर, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर चढवलेल्या शाब्दिक हल्ल्यामुळे तर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दरम्यान, आज मराठी राजभाषा दिनी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेसह विरोधी पक्षांवर निशाणा साधला.

“सावरकरांचे विस्मरण, गणेशोत्सवावर बंदी अन् ईद मुबारकवाल्यांची मात्र चांदी. अभंग विसरुन कव्वाली ऐकू लागले, टाळ-मृदंगा ऐवजी ढोलंक वाजवू लागले. दाऊदच्या समर्थकांचे गोडवे गातात, उठता बसता हल्ली बिर्याणीच हाणतात. मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणतात, हल्ली शिव्यांपुरतेच “ते” मराठीपण जपतात!” असं आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

तो सुदिन देखील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात लवकरच येईल –

तसेच, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गेल्या २५ वर्षांत झाले नाही, तेवढे काम गेल्या पाच वर्षात झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेचा सुदिन लवकरच येईल! असंही शेलार यांनी यावेळी बोलून दाखवलं.

हेही वाचा :  पिंपरीः खेळत्या मुलाला ऊसाचा रस देऊन बोलावलं, नंतर मृतदेहच सापडला! बॉडी पाहून पोलिसही हादरले

“गेली २५ वर्षे केंद्रातील सरकारने या विषयावर जेवढं भरी काम करायला पाहिजे होतं, तेवढं केललं नाही. पण मागील पाच वर्षांमध्ये मी स्वत: देखील याचा भाग असल्याने मी सांगू इच्छितो की जे ठराव, ज्या पद्धतीची माहिती, अधिकची माहिती या सगळ्या गोष्टी केंद्रातल्या आवश्यक असलेल्या मांडणीत करणं, जे २५ वर्षांत झालं नव्हतं ते मागील पाच वर्षांमध्ये झालय आणि आज मी या ठिकाणी हे सांगतोय की, तो सुदिन देखील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात लगेचच येईल.” असं आशिष शेलार म्हणाले.

हे तर शिवसेनेचे टूलकिट…! –

याचबरोबर “पोलिसांच्या चौकशीमध्ये कुठलंही राजकीय भाष्य करावं, असा माझा स्वभाव नाही. पण एकप्रकारची जी कार्यपद्धतीन झाली आहे. की सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तील लक्ष्य करून त्याच्याविरोधात लिहायचं. मग त्यानंतर काही निवडक वर्तमानपत्रांमध्ये त्याच नेत्यांविरोधात लक्ष्य केलेल्या गोष्टी छापून आणायच्या, मग त्याविरोधात मुंबईत किंवा राज्यात काही निवडक पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या तक्रारी नोंदवण्यासाठी शिवसेनच्या महिला आघाडीने जायचं. मग त्यानंतर शिवसेनेच्या असलेल्या महापौर या मुंबईच्या महपौर असल्याचं विसरून एका पक्षाच्या नेत्या आहेत, अशा पद्धतीने त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार करायची आणि मग पोलिसांनी एफआयआर घ्यायचा. शिवसेनेचं हे टुलकिट आहे. पूर्वी नक्षलवादी, अर्बन नक्षल वापरत होते आता शिवसेना वापरतेय.” असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका देखील केली.

हेही वाचा :  केस उपटून काढले, कानाचा पडदा फाटला; मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीकडून घरगुती हिंसाचाराचा आरोप

आशिष शेलार यांनी नाशिक दौऱ्यात आज अभिनव भारत मंदिर वास्तूच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन केले, यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …